अहिवंतवाडी गटात आमदारांच्या पुत्रांमध्ये स्वीय सहाय्यकाची उडी

अहिवंतवाडी गटात आमदारांच्या पुत्रांमध्ये स्वीय सहाय्यकाची उडी

दिंडोरी | प्रतिनिधी | dindori

पेठ विधानसभेतील (Peth Assembly) आघाडी देणारा गट म्हणजे अहिवंतवाडी (Ahivantwadi) या गटात आजी व माजी दोन्ही आमदारांचे गावे येत असल्याने या गटातील आघाडी निर्णायक ठरते.

यामुळे गटावर आपला ताबा पाहिजे, त्यासाठी ना. नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal) व माजी आमदार धनराज महाले (Former MLA Dhanraj Mahale) यांची जुंगलबंदी कायम बघावयास मिळते. परंतू यंदाच्या निवडणूकीत (election) मात्र स्वत: झिरवाळ पुत्र गोकूळ झिरवाळ व धनराज महाले यांचे पुत्र वैभव महाले हे स्वत: रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे ही गटाची निवडणूक म्हणजे पुढील आमदारकीची रंगिततालिमच असेल यात शंका नाही. राष्ट्रवादीकडून ना. नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकूळ झिरवाळ तर शिवसेनेकडून (shiv sena) माजी आमदार धनराज महाले यांचे पुत्र वैभव महाले यांच्याबरोबर झिरवाळ व महाले यांचे स्वीयसहाय्यक म्हणून काम बघितलेले सदाशिव गावित हे सुध्दा शिवसेनेकडून इच्छुक आहेत.

त्यामुळे या निवडणूकीत वर्णी कुणाची लागणार व मतदार कुणाला पसंती देणार हा मोठा कुतुहलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पंचवार्षिक निवडणूक सदाशिव गावित हे स्वत: निवडणूकीत उतरणार आहे. परंतू आरक्षण (Reservations) अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) स्त्री राखीव झाल्याने त्यांनी आपली स्नुषा रोहिणी गावित यांना शिवसेनेकडून उमेद्वारी घेतली व विजयी देखील झाले. यंदा ते स्वत: निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहे. परंतू शिवसेनेकडून माजी आमदार धनराज महाले यांचे चिरंजीव वैभव महाले यांनी जोरदार तयारी केल्याने शिवसेनेच्या उमेद्वारींची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची देखील उत्सुकता तालुक्याला लागली आहे.

एकुणच वातावरण बिघतले तर अहिवंतवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) व शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र झाले आहे. खुल्या जागेसाठी देखील राष्ट्रवादी व शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे नामदेवराव राऊत हे देखील काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचेी उमेद्वारी करण्याची दाट शक्यता आहे. एका पंचवार्षिकला त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीना तर एका पंचवार्षिकला ते स्वत: उमेद्वारी केली आहे. त्यावेळी थोड्या मतांनी त्यांना परावभाचा सामना करावा लाागला होता.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोघांच्या लढतीत काँग्रेसच्या उमेद्वाराला फायदा होईल, तो विजय होईल, असा विश्वास कांँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत या अहिवंतवाडी गटात कोणकोणत्या राजकीय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेमध्ये वैभव महाले व सदाशिव गावित यांच्या उमेद्वारी मिळवण्यासाठी चढाओढ दिसेल, यात शंका नाही. गोकुळ झिरवाळ व वैभव महाले यांनी या गटात स्वत: ची ओळख तयार केली आहे. तर सदाशिव गावित यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाची पावती मतदार मला देतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेसकडून शिवसेना व राष्ट्रवादीच्या लढतीत आमचा उमेद्वार विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करीत असले तरी नक्की काय होईल, याचे उत्तर आज निरंक असले तरीही ही निवडणूक आमदारकीची रंगीत तालिम दिसणार आहे. यामुळे आमदार पुत्रापेक्षा आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई या गटात दिसणार असल्याचे चित्र आज दिसत आहे.

जि.प. सदस्य ते विधानसभा उपाध्यक्ष

2002 मध्ये नरहरी झिरवाळ हे अहिवंतवाडी गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणूकीसाठी श्रीराम शेटे यांनी नरहरी झिरवाळ यांना उमेद्वारी दिली आणि ते आमदार झाले. त्यानंतर 2009 साली थोड्या मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी आपले काम सुरुच ठेवले आणि पुन्हा 2014 व 2019 साली ते विधानसभेच्या निवडणूकीत विजयी झाले. आज ते विधानसभा उपाध्यक्ष म्हणून काम बघत आहे. अहिवंतवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष हा प्रवास नक्कीच मतदार संघासाठी अभिमानास्पद आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com