इगतपुरी रेव्ह पार्टी : ती बिग बॉस फेम अभिनेत्री कोण?

अनेक चित्रपटांमध्ये काम
इगतपुरी रेव्ह पार्टी : ती बिग बॉस फेम अभिनेत्री कोण?

नाशिक | Nashik

इगतपुरी (Igatpuri) येथील रेव्ह पार्टीतून बारा महिलांना अटक करण्यात आली. यामध्ये मराठी बिग बॉस फेम(Marathi Big Boss) अभिनेत्री चा देखील समावेश आहे.

इगतपुरी रेव्ह पार्टी : ती बिग बॉस फेम अभिनेत्री कोण?
निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील रेव्ह पाटर्य़ां कशा रोखणार ?

ही बिग बॉस फेम अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हिना पांचाळ (Actress Heena Panchal) आहे. याशिवाय इटालियन महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, बॉलिवूडच्या दोन महिला कोरिओग्राफर यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कोण आहे हीना पांचाळ?

अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) सारखी दिसणारी डान्सर हीना पांचाळ ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री ( Wild Card Entry) म्हणून सहभागी झाली होती. मात्र महाअंतिम फेरीपूर्वीच तिचा प्रवास संपला होता. हीना पांचाळने हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. हिंदी, मराठी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत ती अनेक ‘आयटम साँग्ज’मध्ये झळकली आहे. ‘मुझसे शादी करोगे?’ या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. हीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) वर्कआउट करतानाचे केलेले व्हिडीओ चांगलेच प्रसिद्ध आहेत. हीनाचे अनेक टीकटॉक व्हिडीओही (Tiktok Video) व्हायरल झाले होते.

इगतपुरी रेव्ह पार्टी

शनिवारच्या रात्री इगतपुरी येथील स्काय वीला येथे पोलीसांना छापा टाकत २२ जणांवर कारवाई केली. याठिकाणी अवैध रित्या अमली पदार्थांचे सेवन, हाय प्रोफाइल पार्टी सुरू होती. यामध्ये अभिनेत्री, कोरिओग्राफर यांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.