सुरगाण्यातील खराब रस्त्यांना वाली कोण ?

सुरगाण्यातील खराब रस्त्यांना वाली कोण ?

खोकरविहीर । देविदास कामडी | Khokarvehir

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) ठाणगाव (thangaon), बेडसे, आंबोडे, अंबुपाडा, जांबुळपाडा पालवी वस्ती, अंबुपाडा आश्रम, खोकरविहीर, झगडपाडा, खोबळा, वांगणपाडा, खिरपाडा, वडपाडा, सागपाडा,

भेनशेत, घाणीचापाडा, सरमाळ, खिराटमाळ, कोडीपाडा घाट, राक्षभुवन आदी गावांना जोडणार्‍या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यांना कुणीच वाली नाही ? असा प्रश्न पडला असून त्वरीत या रस्त्यांची दुरुस्ती (Repair of roads) करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांनी व नागरिकांनी केली आहे.

परिसरातील ग्रामस्थ, वाहनधारक, नोकरदार, शिक्षक (Teachers), यांना रोज याच रस्त्यावरून ये - जा करावी लागते. परिसरातील गावांना बार्‍हे व आंबोडे ही एकमेव बाजारपेठ उपलब्ध आहे. परिसरात बार्‍हे ही प्रमुख बाजारपेठ असल्याने या गावाला जाण्यासाठी दुचाकी, वाहनचालकांना मोठी कसरत करीत जावे लागते. कित्येक वेळा घसरून पडावे लागत आहे.

आंबोडे - केळावण रस्त्यावर भिवतास धबधबा असुन अनेक प्रवासी धबधबा बघण्यासाठी अनेक प्रवासी प्रवास करीत आहेत. एकदा आल्यानंतर दुसर्‍यांदा नकोसे म्हणतात. रस्ता खड्यात (potholes) की खड्ड्यात अशी अवस्था बघून नकोसा हा प्रवास असे बोलून जात आहेत. वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थ यांनी ओरड करूनही रस्ता दुरुस्ती (road repair) होत नाही. या परिसरात रस्त्याच्या बाबतील प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने अनेकांना परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आंबोडेहुन बार्‍हे, आंबे पेठ जाण्यासाठी जवळचा रस्ता अंबुपाडा पालवी वस्ती, जांभूळपाडा मार्गे जवळचा मार्ग आहे.

परंतू अंबुपाडा ते जांभूळपाडा 2 कि. मी. कच्चा रस्ता खडीचा असुन तो डांबरीकरण नसल्याने वाहनधारकांना कठीण परिस्थिती वाहन चालवत न्यावे लागत आहे. बार्‍हे या ठिकाणी सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी पेशंट (patient) घेऊन जाताना चारचाकी वाहन नेताना कठीण परिस्थितीत रुग्णाला वेदना सहन कराव्या लागत आहेत.

बार्‍हे ते ठाणगाव, बेडसे, कोडीपाडा घाट, खिराटमाळ, अंबुपाडा - जांभूळपाडा पालवी वस्ती, बेडसे, अंबुपाडा आश्रम,आंबोडे, सरमाळ, खडकी - केळावण, झगडपाडा - खोकरविहीर, भेनशेत - सागपाडा, सागपाडा - खोबळा वांगनपाडा, खिरपाडा आदी रस्त्यांची लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा प्रशासन, लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनविरोधात अंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.

बार्‍हे -आंबोडे, जांभूळपाडा -अंबुपाडा बेडसे, कोडीपाडाघाट - खिराटमाळ, झगडपाडा ते खोकरविहीर, खडकी ते केळावण, आमदा फाटा ते राक्षभुवन रस्त्याची पाऊसामुळे अत्यंत बिकट स्थिती झाल्याने गरोदर मातांना कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन बार्‍हे येथे पोहचावे लागत आहे. यामुळे या गावाच्या रस्ते लवकरच डांबरीकरण करण्यात यावे रस्त्याची परिस्थिती सुधारावी आमचे हाल कमी करावे.

- आवजी पालवी, सेवानिवृत्त अधिकारी आर, एफ. ओ.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com