हरणबारीचे आवर्तन कधी सोडणार?

मोसम खोर्‍यातील शेतकर्‍यांचा प्रश्न
हरणबारीचे आवर्तन कधी सोडणार?

अंबासन । प्रशांत भामरे | Ambasan

ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणूक (election) आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेले हरणबारी धरणाच्या (Haranbari Dam) पाण्याचे सिंचनासाठी

आवर्तन (water discharge) आता पाटबंधारे विभागातर्फे (Irrigation Department) आचारसंहिता संपुष्टात आल्याने केव्हा सोडले जाते याकडे मोसमखोर्‍यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. रब्बी हंगामातील (kharif season) पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने सदरचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

मालेगावसह (malegaon) बागलाण तालुक्यातील (baglan taluka) मोसमखोर्‍यास वरदान ठरलेले हरणबारी धरण यंदा पाण्याने तुडूंब भरले आहे. मोसम नदी (mosam river) देखील धरण भरल्याने अनेक दिवस प्रवाहीत राहिल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनास देखील दिलासा मिळाला होता. मात्र आता रब्बी हंगाम (rabbi season) सुरू असल्याने पेरणी केलेल्या पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. विशेषत: गहू, हरभरा व लागवड केल्या जात असलेल्या कांद्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मोसमखोर्‍यातील शेतकर्‍यांचे (farmers) लक्ष हरणबारीचे सिंचनासाठी आवर्तन केव्हा सोडले जाते याकडे लागले आहे.

रब्बी हंगामासाठी शेतीला तीन आवर्तन सुटावे अशी अपेक्षा मोसमखोर्‍यातील शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे. दरवर्षी गहू, हरबरा, कांदा पिकासाठी 20 डिसेंबरपर्यत आवर्तन (water discharge) पाटबंधारे विभागातर्फे आवर्तन सोडले जात होते. यंदा मात्र ग्रामपंचायत (gram panchayat) सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनातर्फे आचारसंहिता (code of conduct) लागू करण्यात आल्याने आवर्तन सोडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आचारसंहितेमुळे आवर्तन सोडता येत नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांतर्फे सांगितले जात होते. वास्तविक हरणबारी धरणाचे आवर्तन हे शेती सिंचनासाठी असल्याने त्याचा राजकारणाशी कुठलाही कवडीचा संबंध नाही. त्यामुळे आवर्तनाचे पाणी मिळाले असते तर रब्बी पिकांना ते फायदेशीर ठरले असते. मात्र याकडे दुर्लक्ष करत पाटबंधारे अधिकार्‍यांनी आवर्तन सोडण्यास टाळाटाळ केल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.

विजयी उमेदवारांनी गुलाल देखील उधळला असून निकाल घोषीत झाल्याने आचारसंहिता देखील संपुष्टात आली आहे. त्यामुळे रब्बी पिकांना जीवदान देण्यासाठी हरणबारीच्या पाण्याचे आवर्तन पाटबंधारे विभागाने त्वरीत सोडावे यासाठी पालकमंत्री दादा भुसे, खा.डॉ. सुभाष भामरे, आ. दिलीप बोरसे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी मोसमखोर्‍यातील शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com