निळवंडी पुलाचे काम कधी?

निळवंडी पुलाचे काम कधी?

दिंडोरी । संदीप गुंजाळ Dindori

दिंडोरी तालुक्यातील Dindori Taluka निळवंडी - पाडे रस्त्यावरील पुलाचे काम Nilwandi - Pade Bridge Work गेल्या 7 वर्षापासून रखडले असून त्वरित या पुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निळवंडी-पाडे रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या 7 वर्षापासून सुरु आहे. या 7 वर्षात साधरण फक्त ठेकेदार बदलतात परंतु पुलाची स्थिती मात्र ‘जैसे थे’च आहे. वारंवार मागणी करूनही पुलाचे काम पूर्ण होत नाही. संबंधित विभागाने ठेकेदार बदलण्यातच धन्यता मानली परंतु पुलाचे काम काही पूर्ण झाले नाही.

पावसाळ्यात जुन्या पुलावरुन पाणी जात असल्याने निळवंडी-पाडे गावाचा संपर्क तुटतो. पाडे परिसरातील विद्यार्थी निळवंंडी शाळेत शिक्षणासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्याचबरोबर दिंडोरी, हातनोरे, मडकीजांब, निळवंडी परिसरातील नागरिकांना ननाशी जाण्याचा हा जवळचा मार्ग आहे. वणी खुर्द, ठेपणपाडा, निगडोळ, नळवाडपाडा, चारोसे, उमराळे आदी परिसरातील शेतकर्‍यांना वलखेड मार्गी दिंडोरीकडे आपला भाजीपाला नाशिक बाजारपेठेत किंवा दिंडोरी बाजारपेठेत न्यावा लागतो. त्यामुळे 10 ते 13 कि. मी. अंतर मार्गक्रमण करावा लागतो. त्यामुळे शेतीमाल लवकर बाजारपेठेत पोहचत नाही. त्यांचाही फटका शेतकर्‍यांना बसतो.

याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधीकडे तक्रारी केल्या परतू त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी आश्वासनांची खैरात वाटतात परंतु इतरवेळी कोणीही याकडे लक्ष देत नाही हे या पुलाचे दुर्दैव. प्रशासन देखील वर्तमानपत्रात बातम्या आल्या की पुलावर चक्कर मारत राजकारण्यांप्रमाणे आश्वासन देतात आणि पुन्हा त्याकडे पाठ फिरवतात. हे किती दिवस चालणार असा संतापजनक सवाल सर्वसामान्य नागरीक विचारत आहेत.

लोकप्रतिनिधींकडे विचारणा केली तर प्रशासनाकडे बोट दाखवतात तर प्रशासनाकडे विचारणा केल्यास निधीच्या नावाने लोकप्रतिनिधींकडे बोट दाखवतात हा अंगुलीनिर्देश किती दिवस चालणार? हा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांनी याकडे त्वरित लक्ष देवून या पुलाच्या कामाला मुहूर्त लावावा नाहीतर आता सामान्य जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आतातरी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी दखल घेत कामाला सुरुवात करून काम पूर्ण करावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

निळवंडी पुलाचे काम किती दिवस चालणार याबाबत ठोस सांगणे कठीण झाले आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बातम्या आल्या की तात्पुरते संबंधित विभागाचे अधिकारी येवून उभे राहतात परत कोणीही याकडे फिरकत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या सहसीलतेचा अंत न बघता संबंधित विभागाच्या प्रशासनाने या कामाला सुरुवात करावी. अन्यथा होणार्‍या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार असेल.

कैलास पाटील, गटनेते- पंचायत समिती दिंडोरी

Kailas Patil, Group Leader - Panchayat Samiti Dindori

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com