काझीगढीला मनपा गांभीर्याने कधी घेणार?

काझीगढीला मनपा गांभीर्याने कधी घेणार?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगा किनारी असलेल्या प्राचीन अशी काझीगढी (Kazigadhi) संदर्भात महापालिका (NMC) प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न गंभीर बनला आहे...

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी यंदा कडक भूमिका घेत धोकादायक घरे तसेच वाड्यांना दोन नोटीस दिल्यानंतर पोलिसांच्या (Police) मदतीने रिकामे करण्याचे आदेश दिले असले तरी हे आदेश कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी काझीगढी (Kazigadhi) येथील काही भाग ढासळल्याने प्रशासनासह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली होती. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी (Demand) होत आहे.

महापालिकेच्या (NMC) पश्चिम विभागात असलेल्या जुने नाशिक परिसरातील काझीगढी धोकादायक झाली आहे. या गढीचा नदीच्या बाजूने असलेला मातीचा काही भाग शनिवारी (दि.16) रात्री साडेआठच्या सुमारास ढासळला होता.

येथील लोकं जीव मुठीत घेऊन आपले जीवन जगत आहे, त्यात संततदार पावसात (Rain) मातीचा काही भाग कोसळल्याने मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली होती. नागरिकांनी अग्निशामक दलाला (Fire Brigade) पाचारण केले.

सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही तर मातीदेखील अत्यंत कमी प्रमाणात सरकण्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून गंगा किनारी असलेल्या रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावून महापालिकेने (NMC) हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद केला असल्याची माहिती पश्चिम विभागाचे अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी दिली.

सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना

महापालिका (NMC) प्रशासनाच्या वतीने शहरात १ हजार ११७ विविध प्रकारच्या धोकादायक मालमत्तांना मे महिन्यात तसेच जून महिन्यात याप्रमाणे दोन नोटीस बजावण्यात आल्या आहे. यानंतरही असे धोकादायक घरे रिकामी न झाल्यास पोलिसांच्या (Police) मदतीने घरे रिकामी करण्यात येणार आहे.

सहा धोकादायक घरे नुकतीच महापालिकेने (NMC) रिकामी केली असली तरी काझीगढीचा (Kazigadhi) प्रश्न मात्र गंभीर बनला आहे. दरम्यान शनिवारी रात्री महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा येथील नागरिकांना सूचना करून सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान आतापर्यंत एकाही परिवाराने येथून आपले साहित्य हलविले नाही. यामुळे पुन्हा धोका कायमच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com