वणी हद्दीतील मटका कधी बंद होणार?

वणी हद्दीतील मटका कधी बंद होणार?

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरु झाला असून नुकतेच दिंडोरी पोलिसांनी (police) शहरातील व दिंडोरी पोलिस ठाण्याच्या (Dindori Police Station) हद्दीतील ग्रामीण भागातील मटका अड्ड्यावर कारवाई करत त्यांचा बंदोबस्त केला.

परंतू वणी पोलिस ठाण्याच्या (vani Police Station) हद्दीतील लखमापूर फाटा, चिंचखेड, करंजखेड, वणी शहरात अजूनही मटक्याच्या अड्ड्यांवर परिणाम होत नसून वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यांवर वचक निर्माण करण्यासाठी कोणी वाली आहे की, नाही असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

दिंडोरी शहरात भरवस्तीत सुरु असलेले मटका अड्डे बंद करावे, याबाबत दिंडोरी नगरपंचायतीने (dindori nagar panchayat) ठराव करत तहसीलदार पंकज पवार (Tehsildar Pankaj Pawar) व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ (Police Inspector Pramod Wagh) यांना नगराध्यक्षा मेघा धिंदळे यांना निवेदन (memorandum) दिले होते. त्यावर शहरातील मटके अड्ड्यांवर कारवाई करुन ती बंद केली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील (rural area) मटका धंदेही बंद करण्यात यावे, अशा मागणीने जोर धरला. ग्रामीण भागात मटका राजरोसपणे सुरु आहे. दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका असून या मटका धंद्यामुळे लोकांचे कुटूंब उध्दवस्त होत असून घरातील लहान मुले सुध्दा मटक्याच्या नांदी लागत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने यावर दखल घेत मटका धंदा कायमचा बंद होईल, या दृष्टीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

त्यामुळे काही महिलांनी याबाबत निवेदन (memorandum) देवून तालुक्यातील मटका अड्डे बंद करण्याची मागणी केली होती. त्यावर दिंडोरी पोलिसांनी कारवाई करत बहुतेक मटका अड्ड्यांवर कारवाई करत बंद पाडली. परंतू वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लखमापूर फाटा, चिंचखेड, करंजखेड, वणी शहरात अजूनही मटका अड्ड्यांवर परिणाम झाला नसून राजरोसपणे मटका अड्डे चालू असल्याच्या तक्रारी येत आहे. वणी पोलिस ठाण्याच्या संबंधित अधिकारी याकडे लक्ष केंद्रीत करुन यावर मटका अडड्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी कठोर पाऊले उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बहुतेक ठिकाणी तर बाहेरील व्यक्ती येऊन महत्त्वाच्या गावांमध्ये मटका धंदा चालवित आहे. अश्यांवर कायदेशीर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. मोलमजुरी करणारे नागरिक, तरुण मुले हे मटक्याच्या आहारी गेल्याने कुटूंबाकडे दुर्लक्ष करीत आहे. मटकाबरोबरच दारूच्या आहारी जावून कुटूंबात कलह निर्माण होत आहे. दिवसभर कष्ट करुन हातावर पोट भरणारे मजूर मटक्यामध्ये पैसे उधळून कुटूंबाची उपासमार करीत आहे. मटका चालविणार्‍यांविरुध्द आवाज उठवल्यास दमदाटी केली जाते. बहुतेकांवर मटका चालविणारे हे गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याविरुध्द बोलण्यास कुणीही पुढे येत नाही.

त्याचा फायदा घेऊन मटका धंदा राजरोस चालविण्यात ते यशस्वी होत आहे. पोलिसांनी कारवाई केली तर भाडोत्री इसमाला पुढे करुन पोलिस कारवाई पुर्ण केली जाते. त्यामुळे जो खरा मटका चालविणारा आहे तो बाजूला राहतो. त्यामुळे मटका चालवणार्‍या खर्‍या मालकांविरुध्द कारवाई होत नाही तो पर्यंत हे धंदे समुळ बंद होणार नाही हे देखील वास्तवच आहे. त्यामुळे भाडोत्री ऐवजी खर्‍या मटका चालकाला अटक करुन कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.

तंबी नको कारवाई आवश्यक

वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत हे कर्तत्वदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. नुकतेच बैठक बोलावून आपल्या हद्दीत मटका अड्डे चालू राहणार नाही, यासाठी तंबी दिली आहे. परंतू छुप्या पध्दतीने तर काही ठिकाणी राजरोसपणे मटका अड्डे चालू आहे.लखमापूर फाटा, चिंचखेड, करंजखेड, वणी शहरात मटका चालू असल्याच्या तक्रारी असून त्यांनी स्वत: कठोर पाऊले उचलून मटका अड्डे बंद करण्याच्या अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मटका चालवण्यासाठी मोबाईलचा वापर

मटका अड्डे बंद करण्याच्या सूचना मिळताच दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये मटका बंद झाला. परंतू ऑनलाईन मोबाईलव्दारे मटका धंदा सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फक्त नावापुरते मटका अड्डे बंद न करता त्याचे पर्यायी मार्ग देखील बंद होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने योग्य दखल घेणे अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.