शेतकऱ्यांची रात्रपाळीपासून सुटका कधी?

शेतकऱ्यांची रात्रपाळीपासून सुटका कधी?

ओझे । वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) सध्या महावितरण कंपनीकडून (MSEDCL) अनेकवेळा वीजउपकेद्रांमधून शेतीसाठी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत वीज पुरवठा (Power supply) दिला जात असल्यामुळे शेतकरी (farmers) वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दिंडोरी तालुक्यात बिबट्याची (Leopard) दहशत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रात्री विजपुरवठा (Power supply) होत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण कंपनीने कृषीपंपानां (Agricultural pumps) रात्रीचा विजपुरवठा देवून जखमेवर मीठ चाळल्यासारखे झाले आहे. त्यात रात्री वीजेचा बिघाड झालास तो दिवसही वाया जातो. त्याप्रमाणे विद्यूत रोहित्रांवर डिओ व फ्युज वारंवार जात असल्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यात कायमच अडथळे निर्माण होत आहे. एककीकडे शेतकर्‍यांना जगाचा पोशिंदा म्हणून उपमा द्यायची आणि दुसरीकडे त्यांच शेतकर्‍यांची रात्रीचा वीजपुरवठा देवून पिळवणुक करायाचे असा प्रकार सध्या सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षापासून बिबट्याचा (Leopard) मुक्तसंचार सर्वत्र पाहवयास मिळत आहे. त्यांची दखल वनविभाग (Forest Department) घेत नाही. त्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस त्यांमुळे शेतकरी (farmers) वर्गापुढे मोठे संकट आहे. रात्री पिकाला पाणी दिले नाही तर पिक वाया जाण्याची भिती आणि रात्री बाहेर निघायाचे तर बिबट्याची भिती असे दुयरी संकट बळीराजा पुढे उभे राहिले आहे. सध्या भागातील शेतक र्‍यांच्याकृषीपंपाना तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्रीचा विजपुरवठा केला जात आहे त्यामुळे शेतकरी हैराण आहे.

यांची दखल राज्यकत्यांनी घेतली पाहिजे. दिवसाही शेतात काम करायचे व रात्री पिकांना पाणी द्यायचे त्यामुळे शेतकर्‍यांचे आरोग्य धोक्यात येवून अनेक व्याधीनी त्याला ग्रस्त केले आहे अशी परिस्थिती असतानां बळीराज्याला कुणी वाली राहिलेला नाही. आशा स्वरूपाच्या तीव्र प्रतिक्रिया सध्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com