पीकविमा मिळणार तरी केव्हा?; शेतकर्‍यांमध्ये चिंता

पीकविमा मिळणार तरी केव्हा?; शेतकर्‍यांमध्ये चिंता

जोरण । तुळशीदास सावकार | Joran

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) बहुतांश शेतकर्‍यांनी (farmers) मका (Maize), बाजरी (millet), सोयाबीन (soybean) आदी पिकांचा पीकविमा (Crop insurance) काढला आहे.

सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टी (heavy rain) झाल्याने पिकांची अतोनात हानी (crop damage) झाली. या नुकसानीबाबत शासन व पीकविमा कंपनींच्या (Crop Insurance Companies) आवाहनानुसार संकेतस्थळावर तक्रार (complaint) देखील शेतकर्‍यांनी नोंदवली आहे. मात्र या तक्रारीची शासन व संबंधित विमा कंपनींनी अद्याप दखल घेतली नसल्याने पीकविमा (Crop insurance) मिळणार तरी केव्हा? असा प्रश्न पीक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पडून ते चिंताक्रांत झाले आहेत. बागलाण तालुक्यात यंदा झालेल्या (baglan taluka) मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला.

हातातोंडाशी आलेले पीक पावसाने (rain) जमीनदोस्त केल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतीवृष्टीने (heavy rain) उरलेसुरले पिके देखील वाया गेली. या नुकसानीसंदर्भात शासन तसेच संबंधित पीक विमा कंपनीने शेती पिकाचे नुकसान (crop damage) झाले असल्यास संबंधित संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदविण्याचे आवाहन शेतकर्‍यांना (farmers) केले होते. त्यामुळे पिकविमा काढणार्‍या शेतकर्‍यांनी संकेतस्थळावर तक्रारी नोंदविल्या होत्या.

अतीवृष्टीने खरीप हंगामातील (kharif season) सर्वच पिकांची वाताहत केल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. कर्ज, उसनवार करत हंगाम घेतला होता. पिकविमा असल्याने संकट आल्यास नुकसान भरपाई (compensation for damages) मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांची होती. मात्र पीकविमा कंपनीने अद्याप या तक्रारींची दखल घेतलेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पीक विमा (Crop insurance) कधी मिळणार व तसेच संबंधित कंपनीला कोण जाब विचारणार? असा प्रश्न पडला आहे.

शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. तसेच विमा कंपनी देखील पिकांची नुकसान भरपाई (compensation for damages) देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शासनाच्या भूमिकेसह विमा कंपनींच्या दिरंगाईबद्दल शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शेती पिकाचे नुकसान झाले असल्यास संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्यासाठी विमा कंपनींनी वेबसाईट दिली होती. व शेतकर्‍यांची तक्रार प्राप्त होताच तिचे निवारण 72 तासाच्या आत चौकशी करत केले जाईल, असे विमा कंपनींनी जाहिर केले होते. मात्र तसे घडलेले नाही.

सप्टेंबर महिन्यात शेतकर्‍यांनी तक्रार दाखल केली असता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पीक विमा कंपनीचे काही कर्मचार्‍यांनी अती नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामा (panchanama) केला होता. मात्र या कार्यवाहीस दिड महिना उलटला तरी अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यावर पिकविम्याचा एक रुपयाही वर्ग झालेला नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप पीक विमाच्या प्रतीक्षेत आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अती पाऊस पडल्यामुळे शेतात असलेला मका हे पीक पूर्ण वाया गेले असून त्या मक्याचा पिक विमा काढला होता. पिक विमा कंपनी व तसेच कृषी विभागामार्फत झालेल्या आवाहनानुसार ऑनलाईन तक्रार संकेतस्थळावर दाखल केली होती. संबंधित पिक विमा कंपनीच्या कर्मचार्‍यांनी नुकसानीची पाहणी केली परंतू अद्यापपर्यंत एक रूपया देखील प्राप्त झाला नसल्याची खंत शेतकरी सुकदेव सावकार यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com