
नाशिक । प्रतिनिधी Nashik
धोकादायक इमारतीधारकांना (Dangerous building )केवळ नोटिसा देण्यापुरते औपचारिकता न करता ज्या इमारती पावसाळ्यात ( Rainy Season) कोसळून अपघात होऊ शकतात, अशा इमारतीवर पादचार्यांच्या खबरदारीसाठी धोकादायक इमारत असल्याचे फलक लावावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या होत्या, मात्र अद्याप असे फलक दिसून येत नसल्याने हे फलक ( Notice Board ) कधी लावणार अशी विचारणा होत आहे.
महापालिका आयुक्तांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत, केवळ नोटिसाच नव्हे तर धोकादायक असलेल्या इमारती कोसळून कुठले अपघात होण्यापूर्वी त्या भागातील पादचारी आणि स्थानिकांना माहीतीसाठी संबंधित इमारतीवर धोकादायक असल्याबाबत दर्शन भागावर ठळक फलक लावावेत अशाही सूचना केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झाल्याचे दिसत येत नाही.
नदीकाठी राहणार्यांना नोटिसा
सध्या पावसाळापूर्व कामांना महापालिकेच्यावतीने गती देण्यात आली आहे. प्रशासनाच्यावतीने नालेसफाई तसेच इतर कामे हाती घेतली असून शहरातील नंदिनी नदीसह इतर नदीकिनारे राहणार्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आले आहेत.
1200 वाडे व घरे धोकादायक
नाशिक महापालिका हद्दीत सुमारे बाराशे धोकादायक तसेच अतिधोकादायक घरे, वाडे आहेत. यापैकी सुमारे आठशे धोकादायक घरांना व त्यांच्या मालकांना नोटिसा बजावण्याची कारवाई पूर्ण झाली. तर नोटिसा बजावण्याचे कारवाई सुरू असून सुमारे चार आठवड्यानंतर पुन्हा दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे. यानंतर देखील त्यांनी कारवाई न केल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे पोलिसांच्या मदतीने असे धोकादायक वाडे, घरी रिकामी करण्याची थेट कारवाई होणार आहे.