Video : जेव्हा नाशिकच्या अरुंद 'स्मार्ट रोड'वरून गरुडरथाचे प्रस्थान होते...

स्वयंस्फूर्तीने एकमेकांची घेतली काळजी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या दोन वर्षांपासून थांबलेली रामरथ गरुडरथ (Ramrath Garudrath Miravnuk) मिरवणूक सायंकाळी उत्साहात निघाली. दोन वर्षांच्या नंतर होणाऱ्या रथोत्सवासाठी अबाल वृद्धांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती....

श्रीराम रथ (Shriram rath) व सालकरी बुवा (Salkari Buva) नदीच्या कडेला थांबतात. सालकरी बुवा व्रतस्थ असतात. त्यांना नदी ओलांडायची नसते त्यामुळे ते तिथेच असतात. यानंतर श्री गरूड रथ (Shri Garudrath) नदी ओलांडून श्री रोकडोबा मंदिराजवळ जातो. याठिकाणी गरुडरथाचा या मंदिराला स्पर्श केला जातो. हा क्षण बघण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिककर गर्दी करत असतात.

यानंतर गाडगे महाराज पुलाखालून (Gadgemaharaj Bridge) हा रथ डावीकडे वळतो व सरळ नेहरू चौक, दहिपूल, चांदवडकर लेन या मार्गाने वळून मेनरोडला येतो.

याठिकाणी सर्वात मोठे आव्हान होते ते नव्याने झालेला स्मार्ट रोड. हा रस्ता अतिशय अरुंद होता. नाल्यासारख्या रस्त्यातून हा रथ कसा निघणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.

मात्र, रथाच्या आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांनीच उत्तम नियोजन आणि समन्वय ठेवत हा रथ या मार्गावरून पुढे नेला. जेव्हा पिंपळपारापासून हा रथ पुढे चांदवडकर लेन मार्गाने मेनरोडकडे निघाला तेव्हा येथील प्रत्येकाच्याच छातीत धडकी भरलेली होती.

मात्र निर्विघ्नपणे हा रथ पुढे निघाला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी आणि उत्साह नाशिककरांचा दिसून आला. यानंतर हा रथ पुढे मेनरोडहून बोहोरपट्टी, सरकारवाडा भांडीबजार या मार्गे बालाजी मंदिराकडे निघाला.

Related Stories

No stories found.