समीर भुजबळ तुरुंगात असताना चंद्रकांत पाटलांना कसे भेटले?

छगन भुजबळ : भाजपने पराभव पचवायला शिकावं
समीर भुजबळ तुरुंगात असताना चंद्रकांत पाटलांना कसे भेटले?

नाशिक । प्रतिनिधी

पश्चिम बंगालसारखे फटके आता वारंवार बसणार असून तुम्ही किती लोकांवर रागावणार. पराभवाची देखील सवय करून घ्यायला पाहिजे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांना लगावला.

तसेच भुजबळ तुरुंगात असताना त्यांचे पुतणे मला भेटले असा दावा चंद्रकात पाटिल यांनी केला होता. त्यास प्रतिउत्तर देताना माझ्या अगोदर समीरला अटक झाली होती. मग ते तुरुंगात असताना चंद्रकांत पाटिल यांना कधी भेटले, असा प्रतिप्रश्न भुजबळ यांनी उपस्थित करत चंद्रकात पाटिल यांचा दावा फेटाळून लावला...

बंगाल निवडणुकीवर प्रतिक्रिया दिल्यानंतर चंद्रकांत पाटिल यांनी भुजबळ जामिनावर बाहेर असून महागात पडेल असा इशारा दिला होता. त्यास सोमवारी (दि.३) भुजबळांनी प्रत्युत्तर दिले.

ममता दीदी झाशीच्या राणी सारख्या एक हाती लढल्या. दीदींनी "मेरा बंगाल मैं नही दुगी"अस सांगितल.माझ्या या बोलण्यावर रागावण्या सारख काय आहे ? पराभव सहन करण्याची सवय व्हायला हवी.अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं सहाजीक आहे असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटिल यांना लगावला.

समीर भुजबळ जेल मध्ये असताना त्यांच्याकडे मदत मागायला कसा जाईल. सीबीआय , ईडी यांचा राजकीय उपयोग होतो हे माहिती होत.

आता न्यायदेवता पण त्यांच्या हातात आहे का असा मला प्रश्न पडलाय. तुम्ही सांगाल ते करायला, न्याय देवता म्हणजे सीबीआय ,ईडी नाही. त्यामुळे वडाच तेल वांग्यावर काढू नका,असा टोला त्यांनी हाणला. तसेच बंगाल निवडणुकीत पवारसाहेबांचा अदृश्य नाही स्पष्ट हात होता.पवार साहेबांनी मदत केले हे जगजाहीर आहे असे ते म्हणाले.

पुनावाला यांनी धमकी देणार्‍यांना शोधून काढा

पुनावाला यांनी लंडनमध्ये जाऊन सांगितलं, की मोठ्या व्यक्तिनि धमक्या दिल्या, तर सीबीआय, आयबी यांनी इतर काम करण्यापेक्षा धमकी देणार्‍यांना शोधून काढाले पाहिजे.पुनावाला यांना संरक्षण देऊन लस निर्मितीच काम सुरू करा असे ते म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com