नाशिक - कळवण मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कधी?

नाशिक - कळवण मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कधी?

दिंडोरी । संदीप गुंजाळ | Dindori

नाशिक (nashik) - दिंडोरी (dindori) - कळवण (kalwan) या रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक (Transportation) व त्या मानाने अरुंद रस्ता त्यामुळे अपघाताचे (accidents) प्रमाण वाढत असून या रस्त्याचे रुंदीकरण (road widening) होण्यासाठी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा (National highway class) मिळावा, यासाठी मागील तीन वर्षापुर्वी तत्कालीन खासदारांनी पाठपुरावा सुरु केला होता परंतू त्याला आजतागायत यश आले नाही.

तत्कालीन खासदारांच्या या पाठपुराव्याला विद्यमान खासदारांनी ब्रेक तर लावला नाही ना? अशी शंका उपस्थित करुन विद्यमान खासदार अर्थात केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister Dr. Bharti Pawar) यांनी कळवण - नाशिक रस्त्याला लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून देवून रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नाशिक - कळवण रस्त्यावर सध्या वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले सप्तशृंगीगड (Saptashringigad), दुसरीकडे सापुतारा (saputara) सारखा पर्यटन स्थळ (Tourist destination) तसेच दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र यामुळे पर्यटक व भाविकांचे मांदीयाळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

गुजरात (gujrat) राज्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून देखील या रस्त्याची ओळख आहे. औद्योगिक वाहतूक (Industrial transport) तसेच शिर्डी जाणारे भाविक यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामानाने रस्त्याची रुंदी अल्प प्रमाणात असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्याचबरोबर अरुंद रस्त्यामुळे वाहतुक कोंडीचे प्रमाण देखील वाढले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतुद होण्यासाठी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.

तीन वर्षापुर्वी तत्कालीन खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा लवकरच मिळणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रसिध्द झाल्या होत्या. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे व त्यांनी त्यास संमती दिल्याच्या बातम्या पोहचल्याने जनतेच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. दिवसेंदिवस वाढणारे अपघात व होणारी वाहतूक कोंडी यातून लवकरात लवकर आपली सुटका होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतांना तीन वर्ष उलटून गेले तरी देखील या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालाच नाही. आजही तो प्रतिक्षेतच असल्याने नेमके यामागेचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

केंद्रीयमंत्र्यांकडून अपेक्षा

कर्तव्यदक्ष खासदार म्हणुन उल्लेख असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहे. त्यांची कामाची पध्दत बघता नागरिकांच्या कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही अशी आशा नागरिकांमध्ये आहे. त्यांनी स्वत: जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करीत असल्यापासून तर आजपर्यंत कळवण - नाशिक रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा सामना केला आहे. अपघातांचे दृष्य त्यांनी स्वत: बघितले आहे. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी प्रलंबित असलेल्या या मागणीचा पाठपुरावा करत लवकरात लवकर कळवण - नाशिक रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

साधारण तीन वर्षांपुर्वी मी खासदार असतांना कळवण - नाशिक रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कायदेशीर सर्व पुर्तता करुन ठेवलेली आहे. परंतू नंतरच्या काळात याचा पाठपुरावा कमी पडला की काय? म्हणून या विषय अजून प्रलंबितच आहे. तरीही मी स्वत: लवकरच याविषयी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल.

- हरीश्चंद्र चव्हाण, माजी खासदार, दिंडोरी लोकसभा

नाशिक - कळवण रस्त्यावरील वाहतूक कोंडी व दिवसेंदिवस अपघाताचे वाढलेले प्रमाण हे नक्कीच चिंताजनक असून यावर कायमचा तोडगा निघणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा लवकरात लवकर मिळण्यासाठी केंद्रीयमंत्र्यांनी पाठपुरावा करुन जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरवाव्या, अशी अपेक्षा व्यक्त करते.

मेघा धिंदळे, नगराध्यक्षा, दिंडोरी नगरपंचायत

Related Stories

No stories found.