त्र्यंबकला छावणीचे स्वरूप प्राप्त होते तेव्हा...

त्र्यंबकला छावणीचे स्वरूप प्राप्त होते तेव्हा...

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून मॉक ड्रिल (Mock Drill) घेण्यात आले. अलीकडेच मालेगाव (Malegaon) येथे घडलेल्या दंगल सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिल घेण्यात आले...

त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त (tripuri purnima) रथोत्सव आयोजित केला जातो. गावातून रथ मिरवणूक काढून देवीला भातबळी देण्यात येतो. गेल्या वर्षी करोनामुळे (Corona) त्र्यंबकचा रथोत्सव (Rathotsav) झाला नाही. मूर्ती स्पर्श करून पालखी काढण्यात आली होती.

पेशव्यांचे सरदार विंचूरकर यांनी त्र्यंबकेश्वराच्या चरणी हा रथ अर्पण केलेला आहे. दीडशे वर्षांपूर्वीचा हा रथ असून या लाकडी रथावर नवग्रह अष्टदिक्पाल देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. तसेच रथावर कलात्मक कोरीव काम करण्यात आले आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेला दुपारी त्र्यंबकेश्वर मंदिरातून (Trimbakeshwar Temple) हा रथ निघतो. रथामध्ये त्र्यंबकेश्वरांची पंचमुखी सोन्याची मूर्ती ठेवली जाते. रथाचे सारथ्य करण्यासाठी असलेल्या जागेवर ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवली जाते.

बैलांच्या सहा जोड्या हा रथ ओढतात. सोबत त्र्यंबकेश्वराची पालखीदेखील असते. त्याच देवाच्या पादुका असतात. रथ कुशावर्त तीर्थावर आल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराच्या मूर्तीला गोदावरी जलाने अभिषेक स्नान घातले जाते. येथून परत मेनरोड मार्गे रथ पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात येते.

या रथाला आकर्षक नेत्रदीपक विद्युत रोषणाई तसेच फुलांची रोषणाई केलेली असते. नगरीतील विविध मंडळे पालखी मार्गात फुलांची सजावट करतात रांगोळी काढतात. भाविक पुष्पवृष्टी करीत असतात. हजारो शिवभक्त मिरवणुकीत सहभागी होतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com