व्हाट्सअप्प ग्रूप बनतायेत 'सपोर्ट सिस्टीम'

नाशिक ट्विटरची चळवळ
व्हाट्सअप्प ग्रूप बनतायेत 'सपोर्ट सिस्टीम'

नाशिक | गोकुळ पवार

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने भयानक रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र जोमाने लढतो आहे. वैद्यकीय यंत्रणा देखील 24 तास झोकून देत दोन हात करते आहे.

दरम्यान अशा परिस्थितीत नातेवाईकांची धावपळ न पाहण्यासारखी आहे. बेड आणि मेडिकलसाठी नातेवाईकांची वणवण सूर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच अनेक अनोळखी हात मदतीला धावून येताना दिसत आहेत. महाराष्ट्रात तील अनेक व्हाट्सअप्प ग्रुप ' वॉर रूम' म्हणून तयार झाले आहेत.

दरम्यान एकेकाळी गप्पा, जोक्स, फोरवर्ड पोस्ट वाचण्यात मश्गुल असणाऱ्या मंडळींनी व्हाट्सअप्प चळवळ सुरु केली आहे. या माध्यमातून बेड न मिळालेल्या, चुकीची माहिती मिळालेल्या व त्यानंतर भरकटलेल्या नातेवाईकांना दिशा देण्याचे काम ही 'व्हाट्सअप्प सपोर्ट सिस्टीम' करत आहे. अनावश्यक पोस्ट, जोस्क पाठवणारे हात सध्या हॉस्पिटलची माहिती, आवश्यक नंबर, औषधे उपलब्ध असल्याची माहिती पुरवताना दिसत आहेत.

कोरोनाची दुसऱ्या लाटेत सध्या महाराष्ट्र होरपळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नाशकात घडलेल्या घटनेने नाशिकसह महाराष्ट्र होरपळला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्लाझमा, ब्लड डोनेशन, बेडची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आदींसह विविध आवश्यक नंबर्स चे मॅसेज व्हाट्सअप्प फिरू लागले. महाराष्ट्रातील विविध ठिकाण च्या तरुणांनी एकत्र येत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत मदतीला धावला आहे. औषधे, बेड याची मिळणे शक्य झाल्याने गरजू नातेवाईकांची धावपळ काही अंशी कमी झाली आहे.

मुख्यतः ही चळवळ ट्विटरवर उभी राहिली असून त्यानंतर ती व्हाट्सअप्प च्या स्वरूपात काम करते आहे. या यासाठी त्या त्या जिल्ह्यात व्हाट्सअप्प ग्रुप उभे राहिले आहेत. परंतु एकमेकांना मदत करत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या चळवळीत कलाकारांसह अनेक संस्थाही उतरल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने करोना लढाईत महाराष्ट्र एकवटल्याची जाणीव होत आहे.

नाशिकमधील अनेक ट्विटर हँडल्सनी एकत्र आले आहेत. यामध्ये वी आर नाशिक, प्रसाद गर्भे, नाशिक फीड सह इतर सहकारी सहभागी आहेत.तसेच महाराष्ट्रातील अनेक ट्विटर हँडल्सचा यात समावेश आहे. या सर्वांमार्फ़त अनेक गरजूंना मदत झाली असून ही मोठी चळवळ बनत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com