व्हॉट्सॲप ग्रुपवर चॅटिंग करणे पडले महागात

दोन अल्पवयीन मुलांकडून एकावर वार
व्हॉट्सॲप ग्रुपवर चॅटिंग करणे पडले महागात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

व्हाट्सअप ग्रुप(whatsapp group) वरील चॅटिंग मुळे झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एकावर वार करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला....

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर श्यामसिंग परदेशी (21,रा. मीनाताई ठाकरे स्टेडियम, संत जनार्दन स्वामी नगर गेट समोर, विजय नगर कॉलनी, पंचवटी, नाशिक ) याचा मित्र समाधान आहेर याने त्याच्या मित्रांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता.

या ग्रुपमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. व्हाट्सअप ग्रुपवर चॅटिंग (Whatsapp group chatting) सुरू असताना या दोन्ही अल्पवयीन मुलांचे सागर सोबत वाद निर्माण झाले. याचा राग आल्याने अल्पवयीन संशयितांनी दुचाकीवर जात कोयत्याने सागर याच्या पोटावर वार करून गंभीर दुखापत केली व त्याला मारहाण केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा (panchvati police station) दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी डॉ. सीताराम कोल्हे (Senior pi sitaram kolhe) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक आर.एम. केदार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com