राष्ट्रवादी पक्ष
राष्ट्रवादी पक्ष

पार्थ पवारांचे कान उपटले ते बरोबरचं...

छगन भुजबळ : राष्ट्रवादी पक्ष एक कुटूंब

नाशिक । Nashik

राष्ट्रवादी पक्ष हा एक परिवार असून शरद पवार हे कुटूंब प्रमुख आहेत. त्यामुळे साहजिकच परीवारात कोणी चुकलं तर त्यांना बोलण्याचा व समजवण्याचा अधिकार आहे. माझे काही चुकले तर ते माझा देखील कान धरतात. पन्नास वर्ष राजकिय व अंतराष्ट्रिय राजकारणाचा त्यांचा नुसता अभ्यास नसून ते अनुभवी आहे. त्यादृष्टीने पक्षात कोणी चुकलं असेल तर त्यांना बोलण्याचा अधिकार हे, असे सांगत पार्थ पवारांना ते जे बोलले ते योग्यच असल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी (दि.१४) जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकिनंतर पत्रकारांनी पार्थ पवारांच्या मुद्यावर छेडले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाही. कुटूंबात आजोबांना नातवाला समजवण्याचा अधिकार असतो असे सांगत आम्ही सर्व एक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभिनेता सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही. मी देखील गृह खाते सांभाळलेले आहे. विनाकारण जे नाही ते आहे म्हणून सारखे सारखे दाखवायचे व वातावरण तयार करायचे हे बरोबर नाही. हा चुकिच असेल तर नक्की बोला. पण या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा कोणताही दोष नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात जो पक्ष सत्तेत असतो त्याकडे स्वाभाविकच विरोधी पक्षातील लोकांचा अोढा असतो.

आता शिवसेना व दोन्ही काॅग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे भाजपमधील काही लोक संपर्कात आहे. त्यांचे वडिल व आजोबा हे मुळ काॅग्रेसी अाहेत. त्यांच्यावर काॅग्रेसचे संस्कार आहे. त्यांच्या घरवापसीचा निर्णय हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल व राष्ट्रिय अध्यछ शरद पवार घेतील, असे त्यांनी सांगितले.

ज्योतिषी नसल्याचा राणेंना टोला

भाजप नेते नारायण राणे यांनी हे सरकार तीन महिन्यात पडेल अशी टिका केली होती. त्यावर हे सरकार पडेल की टिकेल हे सांगायला मी ज्योतिष नाही , असा टोला भुजबळांनी नारायण राणे यांना लगावला. तसेच पद्ममश्री पुरस्कारासाठी दोन समित्यांचे त्यांनी समर्थन केले. पद्ममश्री पुरस्कारासाठी अनेक दिग्गज मान्यवर आहे. त्यामुळे ठाकरे समितीकडून आलेल्या नावांची दुसर्‍या समितीतील ज्येष्ठ सदस्यांकडून आणखी छाणणी होईल. त्यात काहि गैर नसल्याचे त्यांनी सांगितले.

Last updated

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com