नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय?

भुजबळांचा राज्य सरकारला सवाल
नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील सिडकोचे (CIDCO) कार्यालय हलवण्यामागे नेमका हेतू काय? असा सवाल उपस्थित करत राज्य शासनाने (State Government) या निर्णयाचा पुनर्विचार करत नाशिकमध्ये सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवावे...

त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी देखील पूर्ववत कायम ठेवण्यात यावेत. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ते म्हणाले की, नाशिकच्या सिडको वसाहतीत तीन लाखाहून अधिक नागरिकांची वसाहत आहे. या वसाहतीतील नागरिकांचे बरेच काम अद्यापही सिडकोकडे असताना अचानक सिडकोची कार्यालय बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे असे सांगत हा निर्णय कोणाच्या दबावत आहे हे अद्याप कळत नाही असे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय?
'डॅडी'बाबत न्यायालयाने घेतला 'हा' मोठा निर्णय

एकीकडे नाशिकचे अनेक प्रकल्प, विमाने कार्यालय पळविले जात आहे. आता सिडकोचे कार्यालय सुद्धा हलविण्यात आले आहे. पळविण्याचा हा सिलसिला सुरूच असून यावर शहरातील आमदार खासदार नेमकं काय करताय यामागे अन्य काही कारण आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच सर्वसामान्य सिडकोवासियांसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे असे त्यांनी सांगितले. यासाठी आपण स्वतः पत्रव्यवहार केला असून अधिवेशनात देखील हा प्रश्न उपस्थित केला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय?
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे हा विनयभंग होत असेल तर लोकलमध्ये हजारो महिला पुरुष प्रवास करतात यामध्ये अनेकांना रोज धक्का लागतो अशावेळी तर दररोज लाखो गुन्हे दाखल होतील असे सांगत आमच्याविरुद्ध देखील चुकीच्या पद्धतीने यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही बाब अतिशय चुकीची असल्याचे ते म्हणाले.

नाशिकमधील सिडकोचे कार्यालय स्थलांतर करण्यामागे हेतू नेमका काय?
तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली कारवाई शेवटी सरकारवरच उलटली अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच कुठल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com