देशदूत
देशदूत
नाशिक

वर्धापनदिनी ‘देशदूत’वर शुभेच्छांचा वर्षाव

वाचकांकडून आठवणींना उजाळा, ऑनलाईन सेलिब्रेशन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दैनिक ‘देशदूत’ने गेली ५० वर्षे वाचकांशी नाळ जुळवून पत्रकारितेतील वैभवशाली परंपरा जपली आहे. काल ‘देशदूत’ने ५१ व्या वर्षांत तेवढ्याच ताकदीनिशी पदार्पण केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘देशदूत’ला शुभेच्छा दिल्या.

करोनाच्या सावटामुळे यंदाचा वर्धापनदिन कार्यालयीन सहकार्‍यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने छोटेखानी पार पडला. असे असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वाचकांनी ‘देशदूत’सोबतच्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘देशदूत’ला पोस्टकार्ड, सोशल मीडिया संदेश, टेक्स्ट मॅसेज तसेच व्हॉईस मॅसेज करून ‘देशदूत’प्रति आदरभाव व भावना व्यक्त केल्या.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी ‘देशदूत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

उद्योजक : तुषार अंध्रूटकर, मंगेश पाटणकर, किशोर केला, रामकिसन राठी, संजीव बाफणा, प्रकाश लद्डा, रमेश वैश्य, मुनीश नारंग, संजीव नारंग, निशिकांत अहिरे, राहुल निगम, हेमंत राठी, गौरव धारकर, विनोद पारख, मुकुंद खाडिलकर.

वैद्यकीय: डॉ. महेश करंदीकर, डॉ. कुणाल गुप्ते, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. निवेदिता पवार, डॉ.राजेंद्र कुलकर्णी,वैद्य विक्रांत जाधव, वैद्य नीलिमा जाधव, डॉ. कल्पना संकलेचा, डॉ. रवींद्र शिवदे.

आर्किटेक्ट: अपेक्षा कुटे, प्रशांत नाकील, अरुण कबरे. बांधकाम व्यावसायिक : जितूभाई ठक्कर, सुनील कोतवाल, अनिल आहेर. संगीत : रागिणी कामतीकर, मोहन उपासणी, नितीन पवार, नितीन वारे, गौरव तांबे, रेखाताई नाडगौडा, अदिती पानसे, अविराज व शुभदा तायडे, आशिष रानडे.

कवी : रवींद्र मालुंजकर. कला : राजेश सावंत, सोनाली करंदीकर. सीए : प्रफुल बरडिया. क्रीडा : विनोद शहा. वकील: शिरीष दणदणे, भानुदास शौचे

संपादक : चंदूलाल शहा, जयप्रकाश पवार, शैलेंंद्र तनपुरे, किरण अग्रवाल.

जाहिरात क्षेत्र : मोतीराम पिंगळे, रवी पवार, सचिन गिते, साहिल न्याहारकर, गौतम सुराणा.

इतर: गौतम ठाकूर, विश्वास ठाकूर, अजय बोरस्ते, शर्वरी लथ, दत्ता भालेराव, अमोल कुलकर्णी, प्रशांत साठ्ये, स्वप्नील तोरणे, लक्ष्मण सावजी, शिवमाला चांडक, विनायक रानडे, शशिकांत पगारे, गौरव तांबे, चिन्मय खेडेकर.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com