'या' तालुक्यात होणार सुसज्ज जॉगिंग ट्रॅक; कोटींचा निधी मंजूर

'या' तालुक्यात होणार सुसज्ज जॉगिंग ट्रॅक; कोटींचा निधी मंजूर

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

कळवण शहराचा (kalwan city) वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन कळवणकरांना अधिकाधिक आकर्षक व मूलभूत सुविधा (Basic amenities) उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत (nagar panchayat) सातत्याने प्रयत्न करत आहे.

कळवणकरांच्या आरोग्याची (health) काळजी म्हणून लवकरच उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक (jogging track) निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे कळवण शहराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. कळवण शहराच्या विकासासाठी आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) व नगराध्यक्ष कौतिक पगार (Kautik Pagar) यांच्या नेतृत्वाखाली विविध कामे मार्गी लागत आहे. नवनवीन नागरी सुविधांची निर्मिती केली जात आहे.

सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शनिमंदिर ते संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत जॉगिंग ट्रॅक (jogging track) उभारणार असून नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत आमदार नितीन पवार यांच्या विशेष पाठपुराव्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी या प्रकल्पासाठी निधी (fund) मंजूर करावा अशी मागणी केली असता या प्रकल्पासाठी 22 कोटी रुपये मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून शनी मंदिर ते बाजार पटांगण (एकलहरे रास्ता) या पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

वैशिष्ट्ये

 • आकर्षक प्रवेशद्वार

 • अंदाजे 1100 मीटर लांबी

 • ट्रॅक बनवताना ब्रिकबॅट मध्ये बनवणार

 • प्रस्तावित लांबीत दोन आकर्षक पुलांचा समावेश

 • नदीच्या प्रवाहाने जमिनीची झीज होऊ नये यासाठी पूर्ण लांबीला सिमेंट कॅांक्रिटच्या भिंतींची तटबंदी

 • बाराही महिने नदीच्या प्रवाहात स्थिर पाणी राहील यासाठी बंधारे

 • नदीलगतच्या बाजूस सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणी बाकांची सोय

 • संपुर्ण ट्रॅकच्या लांबीला उत्तम सावलि आणि अधिकाधिक ऑक्सिजन उत्सर्ग करणारी झाडांची लागवड

 • ट्रॅक वरुन धावताना प्रसन्न वाटण्यासाठी रंगीबेरंगी झुडुपांची सजावट

 • वातावरणात निर्मीती साठी वॅाटर प्रुफ म्युझिक सिस्टम

 • सतिमाता मंदिर व संगमेश्वर महादेव मंदिर परिसरांत चबुतरा

कळवण शहराच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कळवणकरांनी माझ्यावर विश्वास ठेऊन सत्ता दिली. त्यामुळे कळवण शहरात अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून जॉगिंग ट्रॅकसारखे नावीन्यपूर्ण प्रकल्प आगामी काळात करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

- नितीन पवार, आमदार - कळवण - सुरगाणा मतदार संघ

आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहराचा कायापालट करून जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात विकासकामांच्या बाबतीत कळवण नगरपंचायत रोल मॉडेल ठरेल. यासाठी प्रयत्नशील असून विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार पवार यांनी निधी दिल्याबद्दल कळवणकरांच्या वतीने आभार मानतो.

- कौतिक पगार, नगराध्यक्ष कळवण, नगरपंचायत

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com