धम्म पदयात्रेचे नाशिक जिल्ह्यात स्वागत

धम्म पदयात्रेचे नाशिक जिल्ह्यात स्वागत

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

बौद्ध धम्म (Buddhism) यात्रेचे नाशिक जिल्ह्यात अंदरसूल येथे दिमाखात आगमन आणि स्वागत झाले. यानिमित्ताने नाशिक जिल्हा अध्यक्ष (Nashik District President) ज्ञानेश्वर काळे यांनी अनु.जाती विभागाचे प्रांताध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, उपाध्यक्ष प्रशांत पवार यांचे स्वागत केले.

यावेळी तथागत गौतम बुद्ध (Gautama Buddha) अस्थिकलश रथासोबत थायलंड (Thailand) येथील ११० भंते आणि महाराष्ट्रातील उपासक सामिल झाले आहेत. या यात्रेचे सोमवार दि. ६ फेब्रुवारी (सोमवार) रोजी रोजी नाशिकला आगमन होणार आहे.
 या यात्रेचे संयोजक आणि म.प्र.काँग्रेस (Congress) कमिटी अनु.जाती विभागाचे प्रांताध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, टीव्ही मालिका अभिनेते गगन मलिक (Gagan Malik), प्रशांत पवार (उपाध्यक्ष,म. प्र. काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग ), ज्ञानेश्वर काळे  (नाशिक जिल्हाध्यक्ष), जिल्हा सरचिटणीस मनोहर आहिरे, ज्येष्ठ समाजसेवक मोहन अढांगळे आदी मान्यवर यात्रेत सामिल झाले होते.

दरम्यान जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सरचिटणीस मनोहर आहिरे यांनी निफाड, विंचूर, जळगांव नेऊर आदी ठिकाणी होणा-या स्वागताबाबत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या. या यात्रेचे दि. ६ फेब्रुवारी रोजी नाशिकला आगमन होत असून, शहर मार्गावर ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर काळे (Dnyaneshwar Kale) यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com