येवल्यात व्यसनमुक्ती जागृती रथाचे स्वागत

येवल्यात व्यसनमुक्ती जागृती रथाचे स्वागत

येवला । प्रतिनिधी Yevla

स्वर्णिम भारत व्यसन मुक्त अभियान रथाचे ( Swarnim Bharat Addiction Free Campaign Chariot )येवल्यातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ( Prajapita Brahmakumari Ishwariya Visvavidyalay ) येथे आगमण झाले. हा रथ खेडे गावांमधून, येवले शहरात, बाजाराच्या ठिकाणी तसेच विविध नगरामधुन व्यसनमुक्ती संदेश देण्यासाठी फिरत आहे.

डिजिटल रथ देशभरात सेवा करत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये हा रथ फिरत आहे. जनजागृती करणे, व्यसन मुक्तीचा संदेश देणे, तनाव मुक्त रहाणे, मेडिटेशन करणे, स्वतःला मानसिक, शारीरिक रूपाने निरोगी बनविण बीड येथील ब्रह्मकुमार रामनाथ तसेच कोपरगाव येथील संदीप, येवल्यातील अनेक ब्रह्मकुमार बंधू-भगिनी ही या रथाचे स्वागत केले.

रथ रायते, बाभूळगाव, धुळगाव, भाटगाव, सावरगाव त्यानंतर येवला शहरातील सर्व पेट्रोल पंप, गंगा दरवाजा, विठ्ठल नगर, शिक्षक कॉलनी या भागात फिरत पारेगाव रोड, प्रशांत शिंदे नगर, बाजीराव नगर, साई बिल्डर्स, पुष्पम ज्वेलर्स या परिसरात जनजागृती करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com