पंढरपूर ते घुमान सायकलवारीचे नाशकात स्वागत

पंढरपूर ते घुमान सायकलवारीचे नाशकात स्वागत

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

संत नामदेव जयंतीनिमित्त (Saint Namdev Jayanti) 4 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पंढरपूर (Pandharpur) (महाराष्ट्र) ते घुमान (Ghuman) (पंजाब) रथयात्रा व सायकलवारीचे नाशकात आगमन झाले.

यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. संत नामदेव तसेच हरिनामाचा जयघोष तसेच टाळ, मृदुन्गाच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

तुपसाखरे लॉन्सवर कार्यक्रमात सूर्यकांत भिसे, मनोज मांढरे, सायकलिस्ट असोसिएशनचे (Cyclists Association) आबा पाटील, जगन्नाथ पवार,प्राचार्य के.आर.शिंपी, अतुल मानकर, रवींद्र राहणे, संजय नेवासकर, विक्रांत डोंगरे, जगदीश शिंदे, वृषाली तुपसाखरे, अर्चना मानकर, वासंती राहणे, सुवर्णा गिते,

अनुराधा धटिंगण, उषा शिंदे, संतोष खर्डे, सचिन निरगुडे, प्रशांत निरगुडे, रमेश बकरे, सोमनाथ खंदारे आदी व्यासपीठावर होते. सायकलवारी आणि राथयात्रेचा मुक्कामही तेथेच होता. नंतर सायकलवारी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), हरसूल (Harsul), पेठमार्गे (peth) घुमानकडे मार्गस्थ झाली.

भागवतधर्म प्रसारक संघ, पालखी सोहळा पत्रकार संघ नामदेव समाजोन्नती परिषद व नामदेव दरबार कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रथयात्रा व सायकलवारी 2300 किलोमीटरची आहे. तिचा समारोप 28 नोव्हेंबरला चंदिगड (Chandigarh) येथे राजभवनात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Punjab Governor Banwarilal Purohit) यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

दररोज 100 कि. मी.चा प्रवास करीत गुजरात (gujrat), राजस्थान (Rajasthan), हरयाणा (Haryana) मार्गे रथयात्रा व सायकलवारी 26 नोव्हेंबरला घुमान (पंजाब) येथे मुक्कामी पोहोचेल. सायकलवारीत 50 पेक्षा अधिक वयोमान असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 110 सायकल सायकलपटू सहभागी झाले आहेत.त्यात79 वर्षीय सुरेंद्र देशपांडे,74 वर्षीय निरुपमा भावे,72 वर्षीय शिवाजी हंडाळ,71 वर्षीय सुभाष कोकणे तसेच नाशिकचे महेश बडगुजर, अरविंद निकुंभ यांचाही सहभाग आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com