पालक मंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यात जल्लोषात स्वागत

पालक मंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यात जल्लोषात स्वागत

येवला | प्रतिनिधी Yevla

अडचणीच्या काळात येवला लासलगाव Yevla- Lasalgaon मतदारसंघातील नागरिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तुमचा हा विश्वास आणि प्रेम असेच कायम राहुद्या असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांनी केले.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी Maharashtra Sadan Scam Case राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आज मंत्री छगन भुजबळ येवला दौरा केला. यावेळी येवलेकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत भव्य सत्कार केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते आंबदास बनकर, अरुण थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव गुंड, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नवनाथ काळे, हुसेनभाई शेख, विश्वासराव आहेर, रावसाहेब आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, विनोद जोशी, ऍड.बी.डी. देशमुख, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, नगरसेवक दीपक लोणारी, शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ लोणारी, भास्कर कोंढरे, किसनराव धनगे, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, सचिन सोनवणे, अविनाश कुक्कड, उत्तम घुले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले की,गेली काही वर्षे अत्यंत अडचणीत गेली. जो जास्त बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. अखंड हिंदुस्थानात हा प्रकार सुरू आहे. लोकशाही व्यवस्थेची मूल्य पायदळी तुडविण्याचे प्रयत्न केले जात आहे.काही लोक हार घालतात काही प्रहार करत असतात.न्याय दैवता जिवंत आहे तो पर्यंत कुठल्याही व्यक्तीला घाबरण्याचे कारण नाही असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी वर्गाला जितके महत्व आहे तितकेच विरोधी पक्षातील लोकांना देखील आहे. त्याचा देखील तितकाच सन्मान होणे आवश्यक असते मात्र वर्षानुवर्षं विरोधी पक्षाला आदर देण्याची परंपरा गेल्या काळात पायदळी तुडविली गेली असल्याचे सांगत वरिष्ठ न्यायालयात जरी लढण्याचे काही लोक आव्हान करत असतील तरी त्याठिकाणी आपले निर्दोषत्व सिद्ध करू असे त्यांनी शेवटी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com