पालकमंत्री भुजबळ यांचे नाशकात स्वागत

पालकमंत्री भुजबळ यांचे नाशकात स्वागत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यामुळे विरोधकांना " तुझा भुजबळ करू का " हा वाक्यप्रचार आता बदलावा लागेल असा टोमणा राज्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal ) यांनी पत्रकार परिषदेत प्रसंगी भाजपला दिला.

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी (Maharashtra Sadan scam case ) ना. भुजबळ यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता मात्र न्यायालयाने संपूर्ण भुजबळ कुटुंबीयांची या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर भुजबळ आज नाशिकला आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात व फटाक्‍यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भुजबळ यांनी सांगितले की, राजकारणात सहनशीलता फार महत्त्वाची आहे प्रहार सहन करण्याची शक्ती नेत्यांमध्ये असणे गरजेचे आहे.विरोधकांनी माझ्या बाबतीत पोलीस, ईडी चा चुकीच्या पद्धतीने वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. मी तुरुंगात असताना बाहेर कार्यकर्त्यांना तोंड द्यावे लागत होते. माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये मान खाली घालण्याची वेळ आली होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे विरोधकांना देखील आता चांगलेच समजले असेल.

मी तुरुंगात असताना हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. त्या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांपासून ते वृद्धांपर्यंत व महिला देखील त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यामुळे माझ्या प्रती असलेले त्यांचे प्रेम त्यातून दिसून आले. आणि त्यामुळे आमचं आत्मबळ खऱ्या अर्थाने वाढल. आणि न्यायालयाच्या निर्णयाने लोकांनी ठेवलेल्या विश्वासाचं सार्थ झालं.

विरोधक विरोधक उच्च न्यायालयात गाड्याची भाषा करीत आहे असे झाल्यास उलट आनंदच वाटेल आणि अजून उजळमाथ्याने आम्ही लोकांसमोर येऊ शकू सध्या करोना अजून संपलेला नाही त्यामुळे त्या प्रश्नाकडे सरकार लक्ष देत आहे त्यामुळे विरोधकांनी राजकारण करावं त्यामध्ये सहनशीलता ठेवावी मी जे बोलतो ते सत्य बोलतो ते विरोधकांना सहाजिकच टोचणार.जनतेचा आशीर्वाद मिळवणे हेच माझे लक्ष आहे. मतदार हे समजूतदार आहे ते योग्य वेळी मतपेटीतून परिवर्तन दाखवून देतील.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, कोंडाजी आव्हाड, आ. हिरामण खोसकर,माजी खासदार देविदास पिंगळे, नाना महाले, समता परिषद जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, रंजन ठाकरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com