सिन्नरच्या प्रवासी संघटनेकडून ‘सिटीलिंक’चे स्वागत

सिन्नरच्या प्रवासी संघटनेकडून ‘सिटीलिंक’चे स्वागत

सिन्नर। प्रतिनिधी

तालुका प्रवासी संघटनेने Travelers Association सिटीलिंक NMC- Citilink Bus services बसचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. शहराच्या इतर भागातही या बसच्या फेर्‍या सुरु करण्याची मागणी संघटनेने बंड यांच्याकडे केली.

या बसमुळे शहरातील तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, नगरपरिषद, विविध शाळा, वावी वेस, विजयनगर भागातील लोकांची सोय झालेली आहे. त्यांची आर्थिक बचतही होत आहे. महापालिकेच्या बसफेर्‍यांचे नियोजन व प्रवासी सेवा उत्तम आहे. यासाठी प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी प्रितम रायजादे व सतीश मुळे यांनी बंड यांचे अभिनंदन केले.

वाढत्या सिन्नरच्या दृष्टिकोनातून विविध उपनगरांमधूनही बससेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. खर्जे मळा, सदरवाडी रोड परिसरातील संजीवनीनगर, शिवाजीनगर भागातही बसेस कशा सुरु करता येईल यावर चर्चा झाली.

यावर बंड यांनी लवकरच सुचविलेल्या मागण्याबाबत सकारात्मकता दाखवून सिटीलिंकच्या विद्यार्थी पास सवलत, दैनंदिन प्रवास करण्यासाठी मासिक, तिमाही पास, अपंगाना प्रवास सवलतींसह विविध योजनांची माहिती दिली.

Related Stories

No stories found.