ब्राह्मणवाडेत सिटीलिंक बसचे स्वागत

ब्राह्मणवाडेत सिटीलिंक बसचे स्वागत

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नाशिक (nashik) - ब्राम्हणवाडे (Brahmanwade) - सायखेडा (Saykheda) या मार्गावर नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) कंपनीची सिटीलिंक बस (Citylink bus) सुरू झाल्याने बसच्या पहिल्या फेरीचे ब्राम्हणवाडे येथे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून नायगाव खोर्‍यात लालपरी दिसेनासी झाली होती. कोरोना (corona) नंतर पहिल्यांदा नाशिक महानगरपालिकेची बससेवा (Bus service) सुरू झाली असल्यामुळे परिसरातील प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. ब्राम्हणवाडे येथे पहिल्या फेरीलाच यागाडीचे एसटी महामंडळाचे (ST Corporation) सेवानिवृत्त कामगार देवराम गीते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले.

नाशिकहून या दोन बस सकाळी सहा वाजता सुरू होणार असून, शिंदे-पळसे, ब्राम्हणवाडे, सोनगिरी, नायगाव, सावळी, चाटोरी व सायखेडा या मार्गावर त्या धावणार आहेत. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या बस सुरू राहणार आहेत. या मार्गावर बस सुरू झाल्याने परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दुर झाली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास गीते, रवी गीते, उपसरपंच दत्ता गीते, शिवाजी गीते, एकनाथ गीते, राजू गीते, कैलास गीते, सुकदेव गीते, दत्तू पाटील, लक्ष्मण जाधव, किरण गीते, शंकर गीते, अशोक गीते, रघुनाथ गीते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जायगाव-नायगावलाही मागणी

नाशिक - ब्राम्हणवाडे - सायखेडा या मार्गावर सुरु झालेल्या महानगरपालिकेच्या बसच्या फेर्‍यांमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. मात्र, या फेर्‍यांपैकी एक, दोन फेर्‍या या ब्राम्हणवाडे -जायगाव-नायगाव व सायखेडा अशा सुरु करण्याची मागणी देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे, जायगावचे दत्ता दिघोळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com