वर्गसजावटी द्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत

वर्गसजावटी द्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत

लाखलगाव | प्रतिनिधी Nashik

तब्बल दीड वर्षानंतर प्राथमिक विभागाच्या (Primary section) शाळा (school) प्रत्यक्ष भरवण्यात येणार असल्याने शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचे (students) स्वागत व्हावे या उद्देशाने प्राथमिक शिक्षिका शितल सेनाजी पगार (Teacher Shital Senaji Salary) यांनी जय्यत तयारी केली. कोरोनाचे (corona) सर्व नियम पाळून शाळा सुरु करत असताना, वर्ग स्वच्छता, फवारणी, सॅनिटायजर (Sanitizer) व मास्कचा (mask) यथोचित वापर आणि सोशल डिस्टनसिंगचे (Social Distinction) पालन याबाबत विशेष काळजी घेण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दारावर तोरण व शाळेच्या दर्शनी भागात आकर्षक अक्षररांगोळी काढण्यात आली. तसेच वर्गामध्ये रंगबिरंगी पताका आणि फुग्यांची सजावट करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे आनंददायी वातावरण होते. स्वागत प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे प्रदीप कांडेकर तसेच मुख्याध्यापिका विद्यादेवी पगार यांच्या हस्ते गुलाबपुष्प, वही (note book), पेन्सिल (Pencil), गोड खाऊ अशी भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना सर्व कोरोनाचे नियम पळून शाळेत उपस्थित राहण्याबाबत मुख्याध्यापिका मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जि. प. प्राथमिक शाळा लाखलगाव (lakhalgaon) येथे ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रदीप कांडेकर, आरोग्य सेवक शेंडगे, आशावर्कर सौ. चव्हाण, लाखलगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. विद्यादेवी पगार, सर्व शिक्षकवृंद श्रीम. विजया पगार, श्री. विजय जगताप, श्रीम. नीता कदम, श्रीम. शीतल पगार उपस्थित होते. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षक पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com