देवळा l Deola (वि. प्र) :

देवळा तालुक्यातील मेशी, तिसगाव, वाखारी येथील भारतीय सैन्यदलात १७ वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत्त होऊन घरी आलेल्या जवानांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.

देवळा तालुक्यातील मेशी येथील कमलेश शिवाजी जोंधळे (१०७ बॉम्बे इंजीनिअर्स बटालियन) मध्ये कार्यरत होते. त्यांनी श्रीनगर, मणिपूर, आसाम, पुणे, अरुणाचल प्रदेश, झारखंड या ठिकाणी १९ वर्ष देशसेवा करुन ते सेवानिवृत्त झाले. तर तिसगाव येथिल भुमिपुत्र मिलिंद विश्वासराव आहेर (१४ मराठा बटालियन) यांनी श्रीनगर, अहमदाबाद, साऊथ सूडान, लेह लडाख या ठिकाणी १७ वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत्त झाले.

कमलेश व मिलिंद हे दोघंही मेशी येथील प्रगतिशील शेतकरी एकनाथ मोतिराम शिरसाठ यांचे यांचे जावई आहेत. दोघं जावई एकाच वेळी सेवानिवृत्त झाल्याने शिरसाठ परिवार व मेशी गावाकडुन त्यांची मिरवणूक काढुन जंगी स्वागत करण्यात आले.

तसेच तालुक्यातील वाखारी येथील शरद महादु जाधव (पँँरा रेजिमेंट ११६ मराठा बटालियन) मध्ये १७ वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल वाखारी गावाच्या वतिने त्यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले.