देवळाली : सात महिन्यानंतर आठवडे बाजार सुरू

देवळाली : सात महिन्यानंतर आठवडे बाजार सुरू

नाशिकरोड । Nashik road

तब्बल सात महिन्यानंतर देवळालीगाव येथील सोमवारचा आठवडे बाजार सामाजिक अंतर पाळून सुरू झाला. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

मार्च महिन्यात संपूर्ण भारतात करोना महामारी सुरू झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने आठवडे बाजार बंद केला होता. परिणामी त्यानंतर तब्बल सात महिने आठवडे बाजार बंद होता. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत होते.

दरम्यान काल देवळालीगाव येथील सोमवारचा आठवडे बाजार मर्यादित स्वरूपात सुरू झाला. पूर्वी हा बाजार मोठ्या प्रमाणात भरत होता. अनेक भाजीपाला विक्रेते रस्त्यावर येऊन भाजीपाला विक्री करायचे.

परंतु काल मर्यादित स्वरूपात भाजीपाला विक्रेते व इतर व्यावसायिक सामाजिक आंतर पाळून व्यवसाय करताना दिसले. दरम्यान सदरचा आठवडे बाजार सुरू झाल्याने खरेदीसाठी नागरिकांनी दुपारी तीन वाजेनंतर काही प्रमाणात गर्दी केली होती.

अजून बर्‍याच व्यापार्‍यांना आठवडे बाजार सुरू झाला असल्याचे माहिती नसल्यामुळे काल याठिकाणी कमी प्रमाणात व्यापारी दिसले. मात्र पुढील सोमवारी व्यापार्‍यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com