विकेण्डला लग्न सोहळ्यास परवानगी द्यावी

लाॅन्सचालक : सर्वाधिक मुहूर्त रविवार व शनिवारी
विकेण्डला लग्न सोहळ्यास परवानगी द्यावी

नाशिक । Nashik

१६ जून ते १७ जुलै य‍ा कालावधीत लग्नसोहळ्यासाठी मोजून दहा तिथी असून त्यातील बहुतांश शनिवार व रविवारी आहेत. मात्र जिल्हाप्रशासनाने विकेण्ड लाॅकडाउन ठेवला आहे. या तिथी हुकल्यातर मोठे आर्थिक नूकसान होईल. ते बघता अटिशर्तीसह विकेण्डमध्ये लाॅन्स व मंगल कार्यालयात लग्नसोहळ्यास परवानगी द्यावी अशी मागणी लाॅन्सचालकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

मंगल कार्यालय, लाॅन्सचालक व हाॅल असोसिएशन संघटनेने शुक्रवारी (दि.११) पालकमंत्री भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत वरिल मागणीचे निवेदन दिले. करोना लाट आता अोसरत असुन शासनाने नाशिक जिल्ह्याचा तिसर्‍या टप्प्यात समावेश करत लाॅकडाउन शिथील केला आहे. त्यानूसार लग्नसमारंभातील उपस्थिती मर्यादा २० वरुन ५० वर नेली आहे.

ही नक्कीच स्वागतार्य बाब आहे. मात्र शनिवार व रविवारी प्रतिबंध कायम ठेवलेले आहे. १६ जून ते १७ जुलै दरम्यान फक्त १० विवाह मुहुर्त आहेत.त्यातील चार विवाह मुहूर्त हे शनिवार व रविवारचे आहेत. त्यामुळे ज्यांचे मुहुर्त शनिवार व रविवारचे निघाले आहेत ते कुटुंब संभ्रमात आहेत. त्यांना विवाह पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही.

तसेच पुढील शुभकार्य सुध्दा नव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुन सुरु होणार आहेत. तसेच नोकरदार वर्गाचे परिवाराचे घरातील लग्नकार्य हे शनिवारी किंवा रविवारीच्या दिवशी करण्याचा कल असतो. तसेच पुढील १५० दिवसांत फक्त १२ ते १४ दिवस लग्नकार्य चालणार आहेत. अन्य दिवशी मंगल कार्यालय बंदच राहतील.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता शनिवार व रविवार या विकेण्ड लाॅकडाऊनमध्ये अटीशर्तीसह विवाह सोहळ्यास परवानगी द्यावी अशी मागणी लाॅन्स व मंगल कार्यालय चालकांनी केली आहे. निवेदनावर अध्यक्ष सुनिल चोपडा, उपाध्यक्ष संदीप काकड, शंकरराव पिंगळे ,समाधान जेजुरकर, प्रवीण कमले आदींची स्वाक्षरी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com