गोदापात्रात शेवाळाचे साम्राज्य

गोदापात्रात शेवाळाचे साम्राज्य

पंचवटी। वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून गोदापात्रातील पाण्याचा प्रवाह अडविण्यात आलेला आहे. होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतचे गोदापात्र कोरडे ठाक पडले आहे. मात्र दोन तीन दिवसांपासून अचानकपणे थोडाफार पाण्याचा प्रवाह वाढला असून, यासोबत मोठ्या प्रमाणावर असलेली पानवेली वाहून आली आहे. ही पानवेल संपूर्ण नदी प्रवाहावर पसरल्याचे चित्र होते.

सद्यस्थितीत होळकर पूल ते रामवाडी पुलापर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत गोदापात्रात साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गयामुळे गोदावरी नदीचे पाणी अडविण्यात आलेले आहे. यामुळे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे रामकुंड देखील कित्येक दिवसांपासून शेवाळले असल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत गेल्या दोन तीन दिवसांपासून अचानकपणे थोड्याफार प्रमाणात गोदेच्या प्रवाहात वाढ झाली असून, या पाण्या सोबत मोठ्या प्रमाणावर पानवेली वाहून येत आहे. ही पानवेली लक्ष्मण कुंड, रामकुंड, सीता कुंड पासून टाळकुटेश्वर पुलापर्यंत संपूर्ण नदीपात्रात पसरलेली आहे.

प्रथमावस्थेत असलेली ही पानवेली असली तरी प्रचंड झपाट्याने वाढत जाणारी ही पानवेल वेळीच काढली नाही तर नदीपात्रात दाट पानवेल वाढणार असल्याचे अनेकांनी सांगितले. मनपा प्रशासनाने लवकरात लवकर संपूर्ण नदीपात्र पानवेल मुक्त करून येथील तीर्थक्षेत्र महिमा अबाधित ठेवण्याची मागणी गोदाप्रेमींनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com