बाणगंगा नदीपात्रात पानवेलींचे साम्राज्य

बाणगंगा नदीपात्रात पानवेलींचे साम्राज्य

कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe Sukene

कसबे व मौजे सुकेणे ( Kasbe Sukene ) या दोन गावांमधून वाहणारी बाणगंगा नदीचे पात्र पानवेलींनी व्यापले ( Weeds in Banganga River ) असल्याने नदीपात्रातील पानवेली तत्काळ काढाव्यात अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

बाणगंगा नदी पाण्याचा वापर ओझर, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, शिरसगाव, ओणे, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे आदी गावांना होत असून या नदीपात्रातील पाण्यावरच या गावातील पिण्याचा प्रश्न बर्‍याच अंशी सुटला आहे. सध्या पावसाळ्याच्या कालावधीत ही नदी प्रवाहीत झाली असून अनेक ठिकाणी नदीचे पात्र पानवेलींनी व्यापले आहे.

या पानवेलींमुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून हे पाणी परिसरातील विहिरीत उतरून नागरिकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच या पानवेलींची दुर्गंधी परिसरात पसरू लागली असून शासनाच्या माध्यमातून संबंधित विभागाने या पानवेली तत्काळ काढाव्या अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com