सावधान! लग्नाला सोन्याचे दागिने घालून जाताय? आधी 'ही' बातमी वाचा

सावधान! लग्नाला सोन्याचे दागिने घालून जाताय? आधी 'ही' बातमी वाचा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात एका महिलेच्या पर्समध्ये ठेवलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना हनुमान वाडीतील धनदाई लॉन्समध्ये घडली....

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजया नंदकुमार कुलथे (४६,रा.वृंदावन नगरी,ठाकरे मळा, सावतानगर, हिरावाडी, पंचवटी) या त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला (दि.७) रात्री पावणेनऊ वाजेच्या दरम्यान धनदाई लॉन्स येथे गेल्या होत्या.

त्यांच्याकडे असलेल्या पर्समध्ये ७० हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन असा ४ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज ठेवला होता. कुलथे यांनी पर्स त्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर ठेवली होती दरम्यान अज्ञात व्यक्तीने सदरहू पर्स त्यांची नजर चुकवून लंपास केली.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ता शेळके करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com