संशयितांकडून गावठी कट्ट्यासह हत्यार हस्तगत

अंबड पोलिसांची कामगिरी
संशयितांकडून गावठी कट्ट्यासह हत्यार हस्तगत

नवीन नाशिक | प्रतिनिधी Navin Nashik

अंबड पोलिसांनी (Ambad Police) नवीन नाशिक (Navin Nashik) परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा रचून चार संशयितांना अटक (Suspects arrested) करून त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह (gun) धारदार हत्यारे (Sharp weapons) व एक मोटारसायकल (bike) हस्तगत केल्या.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि अंबड पोलीस ठाण्याचे सपोनि किशोर कोल्हे (Saponi Kishore Kolhe of Ambad Police Station) व पोलीस शिपाई प्रशांत नागरे (Police constable Prashant Nagre) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरात दोन संशयित व्यक्तींकडे गावठी कट्टा तसेच अन्य हत्यारे आहेत.

त्यानुसार पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare), उपायुक्त विजय खरात (Deputy Commissioner Vijay Kharat), सहाय्यक आयुक्त सोहेल शेख,अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर कोल्हे,

पोलीस शिपाई प्रशांत नागरे, मुकेश गांगुर्डे, योगेश शिरसाठ, तुषार देसले, प्रविण राठोड, किरण सोनवणे, जनार्दन ढाकणे यांनी पाथर्डी फाटा परिसरात सापळा लावुन संशयित ललीत कल्याणराव गांगुर्डे (२९,रा. साई समृध्दी रोहाउस नं ०१, वावरेनगर, आय टी आय अंबड लिंक रोड नाशिक) ,प्रशांत विष्णु खतोडे (३४, रा. सायखिंडी ता. संगमनेर जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेवुन

त्यांच्याकडून १ गावठी कटटा, १ जिवंत काडतुस, १ मोटार सायकल व ०२ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, असा एकुण १ लाख ३० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सपोनि किशोर कोल्हे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत (दि.२९) रोजी सव्वादोन वाजेच्या सुमारास उत्तमनगर, नवीन नाशिक (navin nashik) येथे प्रणव बाबुराव हिरे (१९, रा. शिंपी समाज मंगल कार्यालयाजवळ, सोनवणे चाळ, दत्तचौक, नवीन नाशिक) ,रवि सुकदेव पांजगे (१९, रा. दत्त मंदिरसमोर, किरण अपा रूम नं २५, नाशिक) हे धारदार शस्त्र घेवुन फिरत असल्याबाबत

पोलीस शिपाई राकेश राउत यांना माहिती मिळाल्याने उपनिरीक्षक सुनील बिडकर,अंमलदार मच्छिंद्र वाकचौरे,हेमंत आहेर, राकेश राउत, जनार्दन ढाकणे यांनी सापळा लावुन त्यांच्याकडून एक धारदार तलवार जप्त करून त्यांच्यावरही भारतीय हत्यार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास हवालदार शेख करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com