अपघात टाळण्यासाठी लवकरच उपाययोजना करू : पाटील

अपघात टाळण्यासाठी लवकरच उपाययोजना करू : पाटील

उमराणे । वार्ताहर | Umrane

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) राहूड घाटात सातत्याने होणार्‍या अपघातांना (accidents) आळा घालण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनेसह उमराणे व चिंचवे निं. बायपास रस्त्यावर पथदीप (street lamp) बसविण्याचे काम लवकरच केले जाईल,

अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालकांनी (National Highways Authority Project Director) दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांच्या सूचनेनुसार पाहणी करण्यात आली.

मुंबई-आग्रा महामार्गावरील राहूड घाटात सातत्याने अपघात होत असून अतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. याबाबत वेळोवेळी निवेदने (memorandum) दिल्यानंतर सोमा टोलवे कंपनीने तात्पुरते उपाय केले आहेत. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासह उमराणे व चिंचवे (निं.) गावाजवळ पथदीप लावण्याच्या मागणीसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना दोन दिवसांपूर्वी भारतीय जैन संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद पाटणी (North Maharashtra Vice President of Indian Jain Association Vinod Patni) यांनी निवेदन (memoraandum) दिले होते.

त्यानुसार काल सायंकाळी तात्काळ राहुड घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्पाचे नाशिक येथील संचालक दिलीप पाटील, सोमा टोलवे कंपनीचे मुख्याधिकारी कृष्णमोहन, प्रकल्प संचालक अनिल सुळे यांनी ना.डॉ. पवार यांच्या सूचनेनुसार घाटाची तसेच चिंचवे गावाजवळील अपघातप्रवण जागेची पाहणी केली. उमराणे बायपास रस्त्यावर पथदीप बसविण्याच्या मागणी संदर्भातही पाहणी करण्यात येऊन त्वरित कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.

याप्रसंगी उपसभापती धर्मा देवरे, माजी सभापती राजेंद्र देवरे, ग्रामशिक्षण समिती सदस्य उत्तम देवरे, चिंतामण मगर, भिला देवरे, दीपक देवरे, तात्या देवरे, चिंचवे (निं) सरपंच रवींद्र पवार, हेमंत पवार, शरद पवार , सुनील पगार आदिंसह परिसरातील ग्रामस्थ व सोमा टोलवे कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com