दिडोरीला विकासकामांच्या योजना देवू: सावजी

दिडोरीला विकासकामांच्या योजना देवू: सावजी

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी (Dindori) शहरात अनेक प्रकल्प राबवता येऊ शकतात. त्यादिशेने सर्वच नगरसेवकांनी (corporators) प्रयत्न करावेत. आता निवडणुक (election) झाल्यानंतर दोन महिन्यातच सर्वप्रथम प्रभाग क्र.10 मद्ये विकासकामांचा (development works) शुभारंभ झाला आहे. त्यामुळे प्रभाग क्र.10 मद्ये येत्या पाच वर्षात प्रचंड विकास झाल्याशिवाय रहाणार नाही, असा विश्वास भाजपाचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी (BJP state vice president Laxman Savji) यांनी व्यक्त केला.

दिंडोरी (dindori) येथे प्रभाग क्र.10 मद्ये नगरसेवक नितीन गांगुर्डे (Corporator Nitin Gangurde) यांच्या पुढाकारातुन मजुरांसाठी श्रमकार्ड वाटप विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपा उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, जिल्हा संघटक सुनिल बच्छाव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले, विवेक सेठ कुलकर्णी याच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी लक्ष्मण सावजी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सैनिक गणपत जाधव होते. यावेळी सावजी यांनी गांधीनगरच्या विकासाचा आढावा घेत सांगितले की गांधी नगर येथील आदिवासी, दलित बांधवाच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री भारती पवार (Union Minister Bharti Pawar) यांच्यासह विधानसभा प्र. अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Jirwal) यांचेही सहकार्य घेण्यात येईल.

गावगाड्यात राजकिय पक्षांच्या कुरघोडीपेक्षा एकत्रित येऊन काम केल्यास प्रभागाचा विकास होईल. त्यामुळे सर्व नगरसेवकांनीही पक्षभेद विसरुन काम करावे,असे आवाहन सावजी यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक सुनिल बच्छाव यांनी सांगितले की नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी सर्वापेक्षा आघाडी घेत प्रभाग क्र.10 मध्ये सर्वप्रथम विकासाची कामे सुरु केली आहे. जर कामाचा वेग असाच राहिला तर अनेक कामे केवळ प्रभाग क्र.10 मध्ये नव्हे तर दिंडोरी शहरात होतील. नितीन गांगुर्डे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रा.बच्छाव म्हणाले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी नगरपंचायत प्रभाग क्र.10 च्या विकासासाठी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

यावेळी सिध्दार्थ नगर ते गोडाऊन रस्ता कामाचा (road works) शुभारंभ करण्यात आला. प्रभागात होणार्‍या सौर पथदिप (Solar streetlights) कामाचे भुमिपुजन (bhumipujan) करण्यात आले. गांधी नगर येथे नगर सेवक नितीन गांगुर्डे यांनी स्वर्ख्चाने मजुर, निराधार, विधवा महिला, गंवडी, शेतमजुर आदींसाठी श्रम कार्ड बनवुन दिले. त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. विलासनाना देशमुख, गणपत जाधव, अ‍ॅड. प्रदिप घोरपडे, रणजित देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास भाजपा एनटी सेलचे जिल्हाध्यक्ष रविद्र गांगोली, सुधाकर चारोस्कर, शाम मुरुकटे,

गणेश बोरस्ते, सूजित मुरुकुटे, हेमंत पगारे, मधुकर गांगुर्डे, गुलाब जाधव, विनोद जाधव, गणेश कदम, शैला पितळे, माकपाच्या श्रीमती मोरे,पोपट चौघुले, बापु जाधव, सिताराम जाधव , शांताराम जाधव, कैलास जाधव आदी उपस्थित होते. स्वागत जितेंद्र गायकवाड,गोकुळ भोंदवे यांनी केले. सुत्रसंचालन नितीन गांगुर्डे यांनी केले. आभार अंकुश मोरे यांनी मानले.

Related Stories

No stories found.