कुपोषण मुक्तीसाठी लढा दिला पाहिजे : डॉ. पवार

कुपोषण मुक्तीसाठी लढा दिला पाहिजे :  डॉ. पवार

सुरगाणा । प्रतिनिधी | Surgana

‘सुरगाणा तालुक्यात (surgana taluka) सामाजिक लोकसहभागातून कुपोषण मुक्तीसाठी (Malnutrition relief) लढा दिला पाहिजे’, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी केले. उंबरठाण (umbarthan) येथे ‘एक लढा कुपोषण मुक्तीसाठी’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. भारती पवार (dr. bharti pawar) बोलत होत्या.

व्यासपीठावर तहसिलदार सचिन मुळीक (Tehsildar Sachin Mulik), गटविकास अधिकारी दिलीप पाटील (Group Development Officer Dilip Patil), अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी युवराज देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे, अर्जून झरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष रमेश थोरात, एन.डी. गावित, नगरसेवक विजय कानडे, डॉ. राजेश चौधरी, चैतन्य चांडोले आदी उपस्थित होते.

डॉ. भारती पवार म्हणाल्या की, वाढदिवसाच्या दिवशी कुपोषित बालकांना (Malnourished children) पोषण आहार देऊन वाढदिवस साजरा केला तर खरोखरच समाधान मिळते. तालुक्याला पुढे जायचे असेल तर तालुका कुपोषण मुक्त झाला पाहिजे. कुपोषण रोखण्यासाठी नागलीची पेजचा वापर करावा. ज्या पद्धतीने करोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे तसेच कुपोषण (Malnourished) हळूहळू कमी केले पाहिजे.

तालुक्यात अती तीव्र कुपोषित 11 बालकं तर तीव्र कुपोषित 94 बालके आहेत. वजन (Weight) कमी, गर्भधारण (Pregnancy) काळातील धोका हि लक्षणे दिसताच गावातील सुईन, दाईन, तज्ञ माता यांना वर्षानुवर्षे कामाचा अनुभव होता त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसतांना अचुकपणे प्रसूती घरच्या घरी केली जात होती. आज नवीन तंत्रज्ञान विकसित झाले तरीही आरोग्य केंद्रात प्रसूती केल्या जात नाहीत. त्याना तालुक्यात, जिल्ह्यात का पाठवले जाते असा सवाल उपस्थित केला.

यावेळी प्राचार्य सिताराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार, डांग सेवा मंडळाचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षिका जे.डी. साबळे, मंगला गायवन, वाय.जी. कुंभार, एस.एस. सोनवणे, यशोदा सहारे, एच.जी. पवार, सी.जी. पवार, सी.जी. भुसारे,एस.टी. होलगडे, आर.एन. चौधरी, पी.पी. टोपले, एम.डी.इंगळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोरे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com