करोना नियंत्रण कारणमिमांसा करणार: जिल्हाधिकारी

आरोग्य विज्ञान विद्यापिठातर्फे होणार संशोधन
करोना नियंत्रण कारणमिमांसा करणार: जिल्हाधिकारी

मालेगाव । प्रतिनिधी Malgegaon

पहिल्या व दुसर्‍या लाटेत करोनाच्या (corona) उद्रेकामुळे हॉटस्पॉट (Hotspot) ठरलेल्या मालेगाव (malegaon) शहरात आज अत्यंत कमी बाधित रूग्ण आढळत आहे. मुंबई (mumbai), पुणे (pune), नाशिकमध्ये (nashik) रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असतांना मालेगाव (malegaon) मात्र पुर्णपणे नियंत्रणात आहे. कुठल्याही करोना सुरक्षा नियमांचे पालन होत नसतांना नवीन रूग्णसंख्या पाचच्या आत असणे निश्चित आश्चर्यकारक गोष्ट ठरली आहे. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या कमी होण्याचे शास्त्रीय कारणे शोधावी लागणार आहे.

या दृष्टीकोनातून आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या (University of Health Sciences) तज्ञांतर्फे या कारणांचे सर्व्हेक्षण (Survey) लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती देत जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी या सर्व्हेक्षणातून निष्पन्न होणार्‍या संशोधनाचा लाभ जिल्ह्यासह संपुर्ण राज्याला निश्चित होवू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर करोनाचा (corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्यासह प्रशासन यंत्रणेत चिंतेचे सावट पसरले आहे.

सर्वत्र बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी पहिल्या व दुसर्‍या लाटेत करोनाचे हॉटस्पॉट (Corona's hotspot) ठरलेल्या मालेगाव शहरात मात्र बाधित रूग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. लसीकरण कमी होण्यासह तोंडावर मास्क न लावणे तसेच सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर न राखणे, करोना सुरक्षा नियमांचे कुठलेही पालन येथे केले जात नसतांना देखील बाधित रूग्णांची संख्या अत्यंत कमी असल्याने याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रूग्णवाढ न होण्याची नेमकी कारणे कोणती, कशामुळे प्रादुर्भाव होत नाही हे शोधण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासन यंत्रणेतर्फे प्रयत्न सुरू झाले आहेत. या दृष्टीकोनातून आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे व नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सदरची कारणे शोधण्यासाठी सर्व्हेक्षणाची विनंती केली असता ती त्यांनी मान्य केली.

या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांच्यासह त्यांच्या पथकातर्फे आज मालेगावी भेट देत मनपा सभागृहात बैठक घेत करोना नियंत्रणाचे शास्त्रीय कारण शोधण्याच्या दृष्टीकोनातून सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, महापौर ताहेरा शेख रशीद, प्रांत विजयानंद शर्मा, उपायुक्त राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त हेमलता डगळे, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, सुनिल खडके, नगरसचिव शाम बुरकूल, विद्युत अधिक्षक अभिजीत पवार, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, उपअभियंता जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ आदी उपस्थित होते.

विद्यापिठाच्या तज्ञांतर्फे लवकरच सर्व्हेक्षणास सुरवात केली जाणार असल्याने शहरातील जनतेने यासाठी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले. या सर्व्हेक्षणात शहरातील नागरीकांची दिवसभरातील दिनचर्येचा अभ्यास केला जाईल. औषध वापराचे तसेच लसीकरणाचे काय परिणाम झाले हे व करोना होवू नये यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहे याची माहिती घेतली जाईल. यावेळी रक्ताचे सॅम्पल देखील घेतले जाईल. या सर्व्हेक्षणाचा लाभ जिल्ह्यासह संपुर्ण राज्याला देखील होवू शकणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

बाधित रूग्णांची संख्या वाढत असली तरी ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनाच रूग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. लस घेतलेले घरीच उपचार घेत असून त्यांना ऑक्सीजनची देखील गरज भासत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्यांनी लसीकरण केलेले नसेल त्यांनी त्वरीत स्वत:बरोबर कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करून घेतले पाहिजे. मनपाने नो व्हॅक्सींन नो एन्ट्री याची अंमलबजावणी सक्तीने केली पाहिजे. लस घेण्याची सक्ती नाही परंतू लस घेतली नसेल तर सार्वजनिक ठिकाणी वावरता येणार नाही, असा इशारा देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com