सिन्नर : वावी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

सिन्नर : वावी पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन

वावी । wavi

इंग्रज काळापासून सुरू असलेल्या वावी पोलीस ठाण्याला आय. एस. ओ. मानांकन प्राप्त झाले असून हे प्रमाणपत्र सहाय्यक निरिक्षक रणजीत गलांडे यांना नुकतेच प्रदान करण्यात आले.

इंग्रज काळात 1921 मध्ये हे पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत कार्यरत झाले होते. त्यात सुरुवातीला एकच हवालदार तैनात होता. मात्र, कामकाज वाढत गेले तशी पोलीसांची व नंतर अधिकार्‍यांची संख्या वाढत गेली.

भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतरही या वावी पोलीस ठाण्याला स्वतःची हक्काची जागा मिळाली नव्हती. या पोलीस ठाण्याच्या भाड्यापोटी लाखो रुपये भाडे शासनाने अदा केले आहे. सन 2009 मध्ये पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी शासनाकडून पुरेसा निधी मंजूर करण्यात आला.

मात्र, त्यासाठी योग्य अशी जागा उपलब्ध होत नसल्याने हा निधी पडून होता. या आधीच्या अनेक अधिकार्‍यांनी इमारतीसाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नव्हते

सन 2016 मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी गावकर्‍यांच्या मदतीने पोलीस कॉलनी जवळचीच जागा पोलीस ठाण्यासाठी निश्चित केली व अवघ्या वर्षभरात या इमारतीचे कामक पूर्ण केले.

त्यानंतर आंधळे यांची बदली झाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी वावी पोलीस ठाण्याच्या पदभार स्वीकारला. बोरसे यांनी त्याआधी वडनेर खाकुर्डी येथील पोलीस ठाण्याचा सुंदर कायापालट केला होता.

त्याच धर्तीवर त्यांनी वावी पोलीस ठाण्याच्या आवाराचेही सुशोभीकरण केले. सन 2019 मध्ये रणजीत गलांडे यांनी वावी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. शेतकरी कुटुंबातील व स्वतः कृषी पदवी घेतलेली असल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात सुंदर गार्डन, स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली.

त्यासाठी पोलीस उपअधिक्षक माधव पडीले-रेड्डी यांचे चांगले मार्गदर्शन त्यांना लाभले. गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान तेथष तयार केले. पोलीस ठाण्याच्या आवाराला लोकसहभागातून संरक्षक जाळी बसवली.

आवारासह संपूर्ण पोलीस ठाण्यात सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवले. या सर्व बाबींंचा आय. एस. ओ. मानांकन मिळवून देण्यात महत्वाचा वाटा राहीला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com