नाशिकमधील धरणांतून 'असे' होणार पाण्याचे आवर्तन

नाशिकमधील धरणांतून 'असे' होणार पाण्याचे आवर्तन
गंगापूर धरण Gangapur Dam Nashik

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गंगापूर (Gangapur) प्रकल्पाच्या नाशिक डावा कालव्यातून सिंचन (Irrigation) व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळा हंगामात प्रत्येकी तीन अशी आवर्तने यंदा दिली जाणार असल्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आला...

जिल्ह्यातील सिंचनाच्या पाणी (Water) रक्षणासाठी पालकमंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील सिंचनाचे पाणी निश्चित झाले.

यामध्ये गंगापूरमधून सहा आवर्तन देण्यासह कडवा प्रकल्पाच्या (Kadwa Project) उजवा कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी एक, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प पालखेड (Palkhed) डाव्या तट कालव्यातून सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन आवर्तने व बिगर सिंचनासाठी उन्हाळा हंगामात दोन आवर्तने दिली जाणार आहे. पालखेड उजव्या तट कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ऊर्ध्व गोदावरीतील ओझरखेड प्रकल्पात (Ozarkhed Project) ओझरखेड व तिसगाव (Tisgaon) कालव्यातून सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळा हंगामात बिगर सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चणकापूर प्रकल्प (Chankapur Project) कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी हंगामात एक व उन्हाळा हंगामात मर्यादित क्षेत्रासाठी एक आवर्तन देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेदेखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

मोठ्या प्रकल्पांमधील पुढील वर्षांसाठी सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना स्थानिक नागरिकांना 20 ते 25 टक्के पाणी आरक्षित असावे. यासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणी आरक्षणाबाबतचा प्रश्न मार्गी लागेल. सर्वांना समान न्याय देता येईल. याबरोबरच रब्बी हंगामाचा विचार करून ज्या भागात पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा स्पष्ट सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या.

जिल्ह्यातील गिरणा धरण (Girna Dam) प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी योग्य नियोजन केले. धरणालगत असणार्‍या एकूण सातगावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. एमआयडीसीसाठी (MIDC) लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सुचना कृषीमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com