गोदेला पाणवेलींचा विळखा
नाशिक । प्रतिनिधी Nashik
गोदावरी नदीवरील सर्व पुलाला पाणवेली अडकतात. वर्षानुवर्षे पाणवेली सातत्याने अडकून राहिल्याने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात थर साचून त्या पाण्याच्या अथवा इतर कोणत्याही पॉकलँड किंवा जेसीबीच्या सहाय्याने निघत नसल्याने प्रशासन हतबल होते. पाणवेली सातत्याने वाढत असून पुलालाही धोका निर्माण होतो. पण पाणवेलींची डोकेदुखी कमी होण्याचे नाव घेत नाही. जोपर्यंत दूषित पाणी नदीपात्रात मिसळणे थांबत नाही, तोपर्यंत पाणवेली कदापि नष्ट होणार नाहीत, अशी स्थिती आहे.
रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मलजल, नाल्यांमधून येणारे रासायनिक पाणी यामुळे नदीपात्रात पाणवेली नाशिकपासून चांंदोरीपर्यर्ंत कायम आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना आजाराला आमंत्रण मिळतेय. आरोग्य विभागाला सातत्याने दक्ष राहावे लागते. हायटेक यंत्रणा वापरून पाणवेली काढाव्यात, अशी सूचना यापूर्वी आ. दिलीप बनकर यांनी केली होती.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
करंजगावचे माजी सरपंच वसंत जाधव यांनी नवीन मशीन आणलेही होते. गोदावरी नदीवरील सायखेडा आणि करंजगाव या दोन्ही पुलाला मोठ्या प्रमाणात पाणवेली अडकतात. पाण्याचा कितीही वेग असला तरी पाणवेली वाहत नाही. एकमेकांवर थर साचल्याने मोठी जाडी तयार होते. ओरड झाली की पाणवेली काढल्या जातात. मात्र नायनाट होत नाही. पाणवेली नदीपात्रातील प्राणवायू शोेषत असल्याने जलचर प्राण्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे पाणवेली एकलहरे बंधार्यात, सायखेडा पुलाजवळ अडकतात व दारणा संगमापर्यंत 9 कि.मी.पर्यंत पसरतात.