नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

नवीन नाशिक मधील राणे नगर येथील सर्व्हिस रोडलगत जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे पाणी पुरवठा विभागाचा गलथानपणा पुन्हा उघडकीस आला आहे.

नवीन नाशकात रोजच कुठल्या ना कुठल्या भागात पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी वाहत असते. मात्र या प्रकारावर मनपा अधिका-यांना काहीही सोयरसुतक दिसत नाही. सर्व्हिस रोड लगत राणेनगर बस स्थानकासमोर शनिवारी सायंकाळच्या सुमारास पिण्याची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

पाण्याच्या प्रवाहाने तब्बल 15 ते 20 फूट उंचीवर पाणी उडत होते. तर रस्त्यावर २ किमी अंतरापर्यंत पाणी वाहत होते. पाणी पुरवठा विभागाच्या दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. वरिष्ठ अधिकारी आता यावर काय कारवाई करतील याकडे नवीन नाशिकरांचे लक्ष लागुन आहे.