टंचाईग्रस्त येवल्यात हजारो लिटर पाणी वाया

टंचाईग्रस्त येवल्यात हजारो लिटर पाणी वाया

येवला | प्रतिनिधी

शहरातील कमानीपुरा भागात पाणी येत नसल्या कारणाने पाईप लाईनच्या वॉलचे काम करत असताना वाल तुटल्याने पाण्याचे फवारे उडून त्यातून हजारो लिटर पाणी वाया गेले...

शहरातील कमानीपुरा व इतर काही भागांमध्ये पाणी येत नसल्या कारणाने येथील निसार शेख यांनी नगरपालिकेला माहीत दिली.

यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी वॉलचे काम करण्यासाठी आले. काम चालु असतानाच अचानक वाल तुटल्यामुळे पाईप मध्ये साचलेल्या पाण्याचे फवारे उडू लागले.

त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. स्थानिक मुलांनी उडणार्‍या फवार्‍या खाली आंघोळीचा आनंद लुटला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com