पाण्याच्या टाक्या बनल्या शोभेच्या वस्तू

पाण्याच्या टाक्या बनल्या शोभेच्या वस्तू

दाभाडमाळ । वार्ताहर | Dabhadmal - Surgana

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) मनखेड, दाभाडमाळ येथील सात ते आठ वर्षांपासून पाण्याच्या टाक्या (water tank) शोभेच्या वस्तू बनल्या असून कोणी पाणी देत का पाणी अशी म्हणायची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षापासून जलवाहिनींसह संपूर्ण पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झालेल्या या पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहे. बांधकाम पूर्ण झाल्यापासून ते आतापर्यंत त्या टाकीपर्यंत पाणीच पोचलेले नाही, नागरिकांनी सतत ग्रामपंचायत, तसेच प्रशासन दरबारी कायम समस्या मांडून देखील लोकप्रतिनिधी, आणि तेथील स्थानिक पुढारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही.

सुरगाणा तालुक्यात (surgana taluka) एकही मोठे धरण (dam) नसल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दोन वर्षांपूर्वी पावसाने (rain) दिलेला दगा आणि गेल्यावर्षी दिलेला हात या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईग्रस्त (Water scarcity) गावांच्या संख्येत मोठीच भर पडली आहे. सुरगाणा तालुक्याला पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे. तालुक्यातील काही गावकर्‍यांनी पाण्याच्या शोधासाठी स्थलांतराचा पर्याय स्वीकारला आहे.

पाणीटंचाई (Water scarcity) तालुक्याच्या वाट्याला पाचवीला पुजलेली आहे. पण गेल्या तीन वर्षांत ती दिवसेंदिवस भीषण रूप धारण करू लागली असून माणसांना पिण्याला पाणी नाही मग जनावरांची काय हाल असेल. म्हणून त्यांना विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सुरगाणा (surgana), पेठ (peth), त्र्यंबकेस्वर हे तालुके उन्हाळ्यात (summer) वर्षानुवषेर् तहानलेले असतात. दर वर्षागणिक या जिल्ह्यामधील या तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून संबंधित जिल्हाधिकारी टंचाईचा आढावा घेताना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून काही उपाय घोषित करतात.

त्याप्रमाणे सरकारी यंत्रणा हलत नसल्याने सार्वत्रिक हतबलता दिसून येते. सद्यस्थितीत सुरगाणा तालुक्यातील अशी अनेक गावे भीषण पाणीटंचाईला तोंड देत आहेत. येथील रहिवाशांनी स्थलांतर करून गंभीर परिस्थितीपुढे माणसाचे काही चालत नाही, असा संदेश दिला. अजून पुढील महिना तालुकावासीयांसाठी वैतागाचा ठरणार आहे. तरी प्रशासन व लोकप्रतीनिधिनीनी या कडे गांभीर्याने लक्ष देऊन हि गावे लवकरात लवकर पाणी टंचाई मुक्त करावी अशी मागणी तेथील स्थानिक रहिवाशी करीत आहे.

मनखेड या गावामध्ये गेली सहा ते सात वर्षापासून ग्रामपंचायतीने हा पाण्याच्या टाकीचा मनोरा उभा करून ठेवला आहे. परंतु आजपावेतो त्या टाकीपर्यंत पाणीच पोचलले नाही, वारवार तक्रार करूनही कोणी त्याची दखल घेत नाही. येत्या दहा दिवसांमध्ये गावामध्ये नळाद्वारे पाणी पोचल नाही तर ग्रामपंचायतीला टाळ ठोकू.

- सुरेश कामडी, मनखेड ग्रामस्थ

दाभाडमाळ या गावामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून ग्रामपंचायतीने हा पाण्याच्या टाकीचा मनोरा उभा करून ठेवला आहे. परंतु आजपावेतो त्या टाकीपर्यंत पाणीच पोचलले नाही, ते पाणी कुठ मुरलेले आहे, याचा प्रशासनाने लवकरात लवकर शोध घेऊन माझ गाव पाणीटंचाई मुक्त करावे अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन करू.

- कांतीलाल भोये, दाभाडमाळ

Related Stories

No stories found.