पाणपोई मोजतेय शेवटच्या घटका

पाणपोई मोजतेय शेवटच्या घटका

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devlali Camp

येथील लेव्हिट मार्केटमध्ये (Levitt Market) येणार्‍या ग्राहक व व्यापारी वर्गाची तृष्णा भागविण्यासाठी 1996 मध्ये कॅन्टोन्मेंट प्रशासन (Cantonment Administration) यांचे परवानगीने

रोटरी क्लबकडून (Rotary Club) उभारण्यातआलेली पाणपोई (water tank) शेवटच्या घटका असून, गेल्या दहा वर्षापासून यातील पाण्याचा वापर केला जात नसल्याने रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचे व्यपारी व नागरीक सांगत आहेत.

शहरात लेव्हीट मार्केटच्या (Levitt Market) प्रवेशद्वारा जवळ रोटरी क्लबच्या माध्यमातून मणिभाई दोशी यांच्या स्मरणार्थ 1996 मध्ये पाणपोई उभारण्यात आली आहे. मात्र तिच्याकडे वेळोवेळी लक्ष न दिल्याने आज ही पाणपोई असून नसल्यासारखी झाली या पाणपोईवरील टाकी बर्‍याच दिवसांपासून स्वच्छ करण्यात आली नाही. याशिवाय पाणी (water) वाहून जाण्यासाठी असलेला पाईपही तुटल्याने पाणी बाहेर वाहते.

याशिवाय रात्रीच्या वेळी या पाण्याच्या टाकीजवळ (water tank) मद्यपी रिकाम्या बाटल्या टाकून जात असल्याने दुर्गंधी येते. पाण्यासाठी असलेले फिल्टर (filter) कॅन्टोन्मेंट प्रशासनाने (Cantonment Administration) काढून घेतले आहे. त्यामुळे नागरिक येथील पाण्याचा वापर पिण्यासाठी करत नसल्याचे आहे. पाणपोईच्या दोन्ही बाजूने कचर्‍याचा विळखा कायम असतो. त्यासाठी प्रशासनाने येथे डस्टबिन (Dustbin) बसविणे गरजेचे आहे.

पाणपोई उभारताना बसवलेला मार्बल हा कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडू शकते, अशी अवस्था झाली आहे. प्रशासनाने तातडीने या पाणपोईची दुरुस्ती करत उन्हाळ्यात (summer) नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी येथे व्यवस्था करावी अशी मागणी येथील व्यापारी वर्गातून होते.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज सर्वाना असते. या पाणपोईची कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाल्याने येथील व्यापार्‍यांसह येणार्‍या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होते. येथील कॅन्टोन्मेंट प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यासाठी सदर टाकी पूर्ववत सुरु करणे गरजेचे आहे.

- नितीन गायकवाड, उपाध्यक्ष, व्यापारी असोसिएशन

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com