नाशिक शहराच्या 'या' विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक शहराच्या 'या' विभागात उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकरोड ( Nashikroad )विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाच्या पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे.

या गळतीचे काम करण्यासाठी प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परिसर, नारायणबापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा., दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर, प्रभाग क्र.18- शिवाजी नगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक,

शिवशक्ती नगर. प्रभाग क्र.19- गोरेवाडी, प्रभाग क्र.20- पुनारोड परिसर, रामनगर, विजय नगर, शाहू नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशा नगर, जिजामाता नगर भागात गुरुवार (दि.3) रोजी सायंकाळचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही व शुक्रवारी (दि. 4) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com