
हरसूल । Harsul
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भाIगातील हरसूल ही खेळाडूंची खाण आहे. खो खो च्या क्रिंडागणावर जिल्हाक्रिडाधिकारी रविंद्र नाईक व जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे सहकारी मुकुंद दिक्षित यांच्या हस्ते जय जनार्दन जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले.
कै. मधुकर मुरलीधर घोडे यांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी तर समिर मांजरेकर यांनी जलपरी भेट दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तोरंगणच्या महिला सरपंच कमल बोरसे होत्या. यावेळी जिल्हाक्रिडाधिकारी रविंद्रनाईक यांनी खोखो खेळाडू यांना विविध सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले. स्वत : ग्रामस्थांनी, महिलांनी, खेळाडूंनी स्वावलंबी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शिकून मोठे झाल्यावर तरूणांनी पुन्हा एकदा आपल्या समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध रहावे असे सांगितले.
नाशिक जिल्हा खो खो असोशियनचे अध्यक्ष मंदार देशमुख, उमेश आठवणे यांनी मार्गदर्शन करत आदिवासी भागातील खेळाडूंना मदतीचे आश्वासन दिले. यावेळी अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्षा सुवर्णा ताई कोठावदे यांनी नाचलोंढी येथील सहा कुमारी धावपटू यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले.
यावेळी खो खो च्या ग्राऊंड साठी जागा देणारे, क्रींडागणासाठी बोअरवेल उपलब्ध करून देणारे लक्ष्मण बोरसे यांचा सत्कार करण्यात आला. क्रिडा शिक्षक दत्ता गुंजाळ यांच्या प्रयत्नातून जलकुंभ साकार झाला.
यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी राजदादा आहेर यांनी शिक्षक हा आदिवासी भागातील समाजप्रबोधन, विकासाचा केंद्रबिंदु असून क्रिडा क्षेत्रात व स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेणारे समाजसेवी शिक्षक संजय गवळी सर यांचा सत्कार करण्यात आला. पेठ, त्र्यंबक, दिंडोरी, सुरगाणा या भागात १७८ वनराई बंधारे श्रमदानातुन बांधण्यात पुढाकार घेणारे जलपरिषदेचे अनिल बोरसे, पोपट महाले या जलमित्रांचा सन्मान करण्यात आला.