पुनद धरणातून पाणीपुरवठा सुरु होणार : नगराध्यक्ष मोरे

पुनद धरणातून पाणीपुरवठा सुरु होणार :  नगराध्यक्ष  मोरे

सटाणा । प्रतिनिधी

महाराष्ट्रदिनी शहराला पुनंद धरण पाणीयोजनेचे पाणी देण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी दिली.

शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्त्वाकांक्षी पुनंद धरण पाणीपुरवठा योजनेच्या शहरांतर्गत 58 किलोमीटर जलवाहिनीच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला येथील अमरधाम रोड परिसरात नगराध्यक्ष मोरे यांच्या हस्ते सुरवात झाली.

त्यावेळी बोलतांना मोरे यांनी कळवण तालुक्यातील पुनंद धरणापासून सटाणा शहरापर्यंत पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीचे काम डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण झाल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या कामाची चाचणी घेण्यात आली आहे.

तसेच शहरातील प्रभागनिहाय अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामातील प्रथम टप्प्यातील प्रभाग 1 ते 3 मधील काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दुसर्‍या टप्प्यातील शहरातील जुने गाव आणि परिसरातील जलवाहिनी टाकण्याच्या काम सद्यस्थितीत सुरु असल्याचे सांगितले.

नगराध्यक्ष मोरे यांच्या सह उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, गटनेते राकेश खैरनार, नितीन सोनवणे, महेश देवरे, नगरसेवक दिनकर सोनवणे, संगीता देवरे, सुरेखा बच्छाव, आरिफ मन्सुरी, शाफिक मुल्ला आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com