सोळा गावे पाणीपुरवठा योजनेचे तीन-तेरा

लासलगावला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा
सोळा गावे पाणीपुरवठा योजनेचे तीन-तेरा

लासलगाव । Lasalgoan

लासलगाव शहराला (Lasalgoan City) पाणीपुरवठा करणार्‍या सोळा गाव पाणीपुरवठा (Sixteen Village Scheme) योजना ही पूर्णपणे मोडकळीस आल्याने शहरातील पाणीपुरवठा (Water Supply) विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात लासलगावसह परिसरात पाण्याची भीषण टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे.

सद्यस्थितीत लासलगाव शहरात पंधरा ते वीस दिवस पाणी येत नाही. पाइपलाइन फुटणे Pipeline rupture), विजेचा खोळंबा (Power outage) आदी कारणांमुळे पाणीपुरवठा सुरळीत करणे अशक्य झाले असून त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे.

सोळा गाव योजनेच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची गरज असून तसा प्रस्ताव देखील ग्रामपालिकेच्या (Grampalaika) वतीने पाठवण्यात आला आहे. मात्र लासलगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालखेड डावा कालव्याला (Palakhed left canal) जोडलेल्या प्रतापसागर वरून पाणीपुरवठा कायमस्वरूपी पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी

लासलगाव शहर विकास सेवा समितीच्या (Development Services Committee) वतीने गटविकास अधिकारी संदीप कराड, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, लासलगाव ग्रामपंचायत सरपंच यांची भेट घेतली आहे. तसेच पालकमंंत्री छगन भुजबळ, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनाही निवेदन दिलेले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com